गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाची तयारी; सातारा जिल्ह्यात तालुकानिहाय संपर्क अधिकाऱ्यांची नियुक्ती, मोबाईल क्रमांक जाहीर

गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाची तयारी; सातारा जिल्ह्यात तालुकानिहाय संपर्क अधिकाऱ्यांची नियुक्ती, मोबाईल क्रमांक जाहीर

सातारा प्रतिनिधी : 

आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण होत असलेल्या अस्थिर परिस्थितीचा परिणाम इंधन पुरवठा साखळीवर होण्याची शक्यता लक्षात घेता सातारा जिल्हा प्रशासनाने एलपीजी (LPG) गॅस सिलिंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महत्त्वाची उपाययोजना केली आहे. जिल्ह्यातील नागरिक, हॉटेल व्यावसायिक, शैक्षणिक संस्था तसेच रुग्णालयांना गॅस पुरवठ्याबाबत कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी प्रत्येक तालुक्यासाठी स्वतंत्र संपर्क अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांचे मोबाईल क्रमांकही जाहीर करण्यात आले आहेत.


सध्या राज्यासह देशभरात इंधन पुरवठ्याबाबत काही प्रमाणात चिंता व्यक्त केली जात असताना सातारा जिल्ह्यात एलपीजी गॅस सिलिंडरचा पुरवठा सुरळीत राहावा तसेच नागरिकांना तातडीने मदत मिळावी यासाठी जिल्हा प्रशासनाने तालुकास्तरावर नियंत्रण यंत्रणा उभारली आहे. या अंतर्गत नियुक्त केलेले संपर्क अधिकारी नागरिकांच्या तक्रारी, अडचणी किंवा तातडीच्या गरजांबाबत संबंधित विभागांशी समन्वय साधून तात्काळ उपाययोजना करण्याचे काम करणार आहेत.

जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिक, शैक्षणिक संस्था, औद्योगिक संस्था, उपहारगृहे (हॉटेल्स) तसेच रुग्णालयांना एलपीजी गॅस पुरवठ्याबाबत अडचण निर्माण झाल्यास त्यांनी आपल्या संबंधित तालुक्यातील नियुक्त संपर्क अधिकाऱ्यांशी थेट संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

प्रशासनाने जाहीर केलेल्या माहितीनुसार सातारा तालुक्यासाठी श्री. अनिल शिंदे (मो. ९५४७३४३४१०), कराडसाठी श्रीमती जाह्नवी नायकवडे (मो. ९११२८९८७८८), पाटणसाठी श्री. राजू माने (मो. ९६२०३१७९०२), कोरेगावसाठी श्री. प्रजोत कदम (मो. ९९३२१५४४६५), खटावसाठी श्री. गणपतर पाटीलवाड (मो. ९६२३३३३९४५), माण तालुक्यासाठी नेपाळा आवटे (मो. ९६८३७९९९९६), फलटणसाठी श्री. श्रीकांत कडूण (मो. ९४२२६२६५४७), खंडाळ्यासाठी श्रीमती शिला आगरवे (मो. ९०३३०२४९३२), वाईसाठी श्री. समीर शिर्के (मो. ९८२३८७६६५४), महाबळेश्वरसाठी श्री. केतन पवार (मो. ९५२७४९४९६३) आणि जावळीसाठी श्री. दीपक पाटील (मो. ९७६३८७२६४३) यांची संपर्क अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच जिल्हास्तरावर समन्वयासाठी जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय सातारा येथे श्री. जितिन पुजारी (मो. ९१२३८५४२७३) यांची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे.

एलपीजी गॅसचा पुरवठा सुरळीत राहण्यासाठी प्रशासनाकडून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात असून आवश्यकतेनुसार अतिरिक्त उपाययोजना देखील करण्यात येणार आहेत. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीवर विश्वास ठेवावा तसेच कोणतीही अडचण निर्माण झाल्यास संबंधित तालुक्याच्या संपर्क अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl