नाकिंदा उर्दू शाळेत विज्ञान दिनानिमित्त भव्य विज्ञान प्रदर्शन; विद्यार्थ्यांच्या कल्पकतेने उपस्थित भारावले

नाकिंदा उर्दू शाळेत विज्ञान दिनानिमित्त भव्य विज्ञान प्रदर्शन; विद्यार्थ्यांच्या कल्पकतेने उपस्थित भारावले

नाकिंदा, ता. महाबळेश्वर:

आज दिनांक २८ फेब्रुवारी २०२६ रोजी विज्ञान दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळा नाकिंदा येथे भव्य विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन ग्रामपंचायत सदस्य जहीरभाई डांगे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी पालक, ग्रामस्थ, शिक्षक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेली विविध वैज्ञानिक मॉडेल्स सादर केली. यामध्ये चांद्रयान-३ रॉकेट विथ आदित्य-१, स्मार्ट फार्मिंग सिस्टीम, धरण मॉडेल, मल्टीफंक्शन क्रेन, ऊर्जा निर्मिती कशी करावी, ज्वालामुखी, एअर कूलर, सौरमंडळ, जलविद्युत धरण, स्वयंचलित ध्वजारोहण यंत्र, प्रदूषण नियंत्रण, व्हॅक्युम क्लिनर, पवनचक्की, वॉटर सायकलिंग, पाण्याचे स्रोत आदी मॉडेल्स विशेष आकर्षण ठरली. विद्यार्थ्यांनी ही सर्व साहित्ये स्वतः तयार केली असून यासाठी त्यांनी शिक्षक, पालक तसेच मोठ्या भाऊ-बहिणींचे मार्गदर्शन घेतले होते.

मेडगुताड केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. डी. डी. ढेबे यांनी विद्यार्थ्यांना विविध प्रश्न विचारून त्यांच्या विचारशक्तीला चालना दिली तसेच विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे व पालकांचे कौतुक केले. ब्राईटलँड हॉटेलच्या सेल्स मॅनेजर अनिता मॅडम यांनी प्रत्येक विद्यार्थ्यांशी संवाद साधून नाकिंदा शाळेतील विद्यार्थी भविष्यात इस्रोमध्ये नक्कीच जातील, असा विश्वास व्यक्त केला. श्री. निकम सर व पवार सर यांनी प्रत्येक टेबलावर जाऊन विद्यार्थ्यांकडून मॉडेल्सची माहिती घेतली आणि त्यांचे मनोबल वाढविले. माजी विस्तार अधिकारी सुरेंद्र भिलारे व शिक्षक संघाचे अध्यक्ष श्री. रवींद्र भिलारे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून शाळेला शुभेच्छा दिल्या. तसेच झहीरभाई डांगे यांनी भविष्यात नाकिंदा गावात डॉक्टर, वैज्ञानिक, अभियंते व कंत्राटदार घडतील, असा विश्वास व्यक्त केला.

या विज्ञान प्रदर्शनाला ग्रामपंचायत नाकिंदा उपसरपंच रफिकभाई वारुणकर, केंद्रप्रमुख डी. डी. ढेबे, माजी विस्तार अधिकारी सुरेंद्र भिलारे, महाबळेश्वर शिक्षक संघाचे अध्यक्ष रवींद्र भिलारे, चेतन दत्ताजी गायकवाड हायस्कूल मेटगुताडचे मुख्याध्यापक श्री. निकम, मेटगुताड शाळेचे पदवीधर शिक्षक पवार सर, क्षेत्रमहाबळेश्वर शाळेच्या बुशरा वारुणकर मॅडम, ब्राईटलँड हॉटेलच्या सेल्स मॅनेजर अनिता मॅडम, असलम डांगे, नासिरभाई बडाणे आदी मान्यवरांनी भेट दिली. पालक व ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावून प्रत्येक टेबलावर जाऊन विद्यार्थ्यांशी चर्चा करत प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून प्रदर्शनाचा आनंद घेतला.

हे विज्ञान प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षिका सौ. शाहिस्ता शेख मॅडम, श्रीमती आसिया पटेल मॅडम व श्री. वसीम वारुणकर सर यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी मुख्याध्यापक श्री. वसीम वारुणकर यांनी उपस्थित सर्व मान्यवर, पालक व ग्रामस्थांचे आभार मानून शाळेला भविष्यातही असेच सहकार्य करण्याची विनंती केली.

एकूणच जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळा नाकिंदा येथील विज्ञान प्रदर्शन विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेचा, जिज्ञासेचा आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा उत्कृष्ट आविष्कार ठरला असून कार्यक्रम उत्साहात पार पडला.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl