ब्रेकिंग न्यूज | कुंभरोशी गणातून राष्ट्रवादी काँग्रेसची भक्कम आघाडी — पहिल्या फेरीचे अधिकृत निकाल जाहीर
ब्रेकिंग न्यूज | कुंभरोशी गणातून राष्ट्रवादी काँग्रेसची भक्कम आघाडी — पहिल्या फेरीचे अधिकृत निकाल जाहीर
महाबळेश्वर प्रतिनिधी :
महाबळेश्वर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या मतमोजणीदरम्यान कुंभरोशी गणातील पहिल्या फेरीचे अधिकृत निकाल जाहीर झाले असून, यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ने स्पष्ट आघाडी घेतल्याचे चित्र दिसून आले आहे.
कुंभरोशी गणातून पंचायत समितीचे उमेदवार सचिन उतेकर (राष्ट्रवादी काँग्रेस) यांना १२९९ + ३ मते मिळून त्यांनी मोठी आघाडी घेतली आहे. त्यांच्यापाठोपाठ संजय मोरे (शिवसेना) यांना ६६१ + ११ मते मिळाली असून ते दुसऱ्या क्रमांकावर आहेत. सुरेश जाधव (भाजप) यांना १४९ मते मिळाली आहेत. अपक्ष उमेदवार सनि मोरे यांना ६७ + १, तर समीर चव्हाण यांना १८ मते मिळाली आहेत.
जिल्हा परिषद गटामध्येही राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय गायकवाड यांनी १०८४ + ८४ मते मिळवत आघाडी घेतली आहे. शिवसेनेचे उमेदवार अजित सकपाळ यांना ८८२ + २१ मते मिळाली असून ते दुसऱ्या क्रमांकावर आहेत, तर भाजपचे उमेदवार सुभाष सोंडकर यांना २४८ + १ मते मिळाली आहेत.
पहिल्या फेरीच्या निकालामुळे कुंभरोशी गणात राष्ट्रवादी काँग्रेसची पकड मजबूत असल्याचे स्पष्ट झाले असून, पुढील फेऱ्यांमध्ये ही आघाडी कायम राहते की समीकरणे बदलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मतमोजणी केंद्रावर उत्साही आणि चुरशीचे वातावरण असून, निकालाबाबत राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
मतमोजणीतील प्रत्येक ताजे अपडेट, अधिकृत आकडेवारी आणि निकालातील घडामोडी जाणून घेण्यासाठी ‘माझं गाव माझी बातमी’ वाचत रहा. महाबळेश्वर तालुक्यातील जलद, अचूक आणि विश्वासार्ह अपडेट्ससाठी पत्रकार विलास काळे, मिलिंद काळे आणि जितेंद्र करंडे यांच्यासोबत जोडलेले रहा.
Comments
Post a Comment