महाबळेश्वर तालुक्यात मतमोजणीला सुरुवात! टपाली मतमोजणी सुरू — निकालाकडे सर्वांचे लक्ष
महाबळेश्वर तालुक्यात मतमोजणीला सुरुवात! टपाली मतमोजणी सुरू — निकालाकडे सर्वांचे लक्ष
महाबळेश्वर प्रतिनिधी
महाबळेश्वर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची मतमोजणी आज अधिकृतपणे सुरू झाली असून, सर्वप्रथम टपाली मतमोजणीला सुरुवात करण्यात आली आहे. सकाळपासूनच मतमोजणी केंद्र परिसरात उमेदवार, कार्यकर्ते आणि माध्यम प्रतिनिधींची मोठी गर्दी पाहायला मिळत असून, निकालाबाबत नागरिकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.
टपाली मतांमधून कोणत्या उमेदवाराला किती आघाडी मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अनेक वेळा टपाली मतांचा कल अंतिम निकालावर निर्णायक ठरत असल्याने, प्रत्येक फेरीतील आकडेवारीकडे राजकीय वर्तुळासह सर्वसामान्य नागरिक बारकाईने लक्ष ठेवून आहेत. मतमोजणीच्या प्रत्येक टप्प्यावर वातावरणात चुरस आणि उत्साह दिसून येत आहे.
मतमोजणी प्रक्रियेतील प्रत्येक ताजे अपडेट, अधिकृत आकडेवारी आणि निकालातील महत्त्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी ‘माझं गाव माझी बातमी’ वाचत रहा. महाबळेश्वर तालुक्यातील अचूक, जलद आणि विश्वासार्ह अपडेट्ससाठी पत्रकार विलास काळे, मिलिंद काळे आणि जितेंद्र करंडे यांच्यासोबत जोडलेले रहा.
Comments
Post a Comment