ब्रेकिंग न्यूज |महाबळेश्वरमध्ये मतमोजणीला थराराची सुरुवात! पहिल्या फेरीअखेर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आघाडीवर



ब्रेकिंग न्यूज |
महाबळेश्वरमध्ये मतमोजणीला थराराची सुरुवात! पहिल्या फेरीअखेर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आघाडीवर

महाबळेश्वर प्रतिनिधी :
महाबळेश्वर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची मतमोजणी आज जोरात सुरू असून, कुंभरोशी गण आणि तळदेव गटातील पहिल्या फेरीचा अधिकृत निकाल जाहीर झाला आहे. या पहिल्या फेरीअखेर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे दोन्ही उमेदवार आघाडीवर असल्याची अधिकृत माहिती प्राप्त झाली आहे.

पहिल्या फेरीत शिवसेना पक्षाचे दोन्ही उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर असून, भाजपाचे दोन्ही उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर असल्याचे स्पष्ट झाले आहे. मतमोजणी केंद्र परिसरात सुरुवातीपासूनच चुरशीचे आणि उत्साही वातावरण असून, प्रत्येक फेरीतील आकडेवारीकडे राजकीय वर्तुळासह सर्वसामान्य नागरिकांचेही बारकाईने लक्ष लागले आहे.

पुढील फेऱ्यांमध्ये चित्र बदलणार की राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी अधिक मजबूत होणार, याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

मतमोजणीतील प्रत्येक ब्रेकिंग अपडेट, अधिकृत आकडेवारी आणि निकालातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी ‘माझं गाव माझी बातमी’ वाचत रहा. महाबळेश्वर तालुक्यातील जलद, अचूक आणि विश्वासार्ह अपडेट्ससाठी पत्रकार विलास काळे, मिलिंद काळे आणि जितेंद्र करंडे यांच्यासोबत जोडलेले रहा.



Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl