आरफळमध्ये शिवजयंतीचा दिमाखदार उत्सव: प्रभातफेरी, पोवाडे, नाटिका आणि विद्यार्थ्यांच्या सादरीकरणातून शिवरायांना मानाचा मुजरा

आरफळमध्ये शिवजयंतीचा दिमाखदार उत्सव: प्रभातफेरी, पोवाडे, नाटिका आणि विद्यार्थ्यांच्या सादरीकरणातून शिवरायांना मानाचा मुजरा

आरफळ प्रतिनिधी  — 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आरफळ गावात आज अत्यंत उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला. पहाटे प्रभातफेरीने कार्यक्रमाची सुरुवात झाली. ढोल-ताशांच्या गजरात, शिवघोषांच्या निनादात आणि भगव्या पताकांच्या साक्षीने निघालेल्या या प्रभातफेरीत शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. संपूर्ण गाव शिवमय झाले होते.

यानंतर आयोजित मुख्य कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. स्वागत व प्रस्तावनेतून उपस्थितांना शिवरायांच्या पराक्रमाची, आदर्श नेतृत्वाची आणि स्वराज्य संकल्पनेची ओळख करून देण्यात आली. विद्यार्थ्यांच्या विविध सांस्कृतिक सादरीकरणांमुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली.

कार्यक्रमात अष्टप्रधान मंडळाचा सविस्तर व अभ्यासपूर्ण परिचय सई पवार, अंशिका पवार, मुग्ध पवार, क्षीरसागर, चैतन्य पवार, माधव पवार आणि वरद दीक्षित यांनी सादर केला. इयत्ता दुसरी, तिसरी आणि चौथीतील सर्व विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या पोवाड्यांनी उपस्थितांमध्ये जोश आणि अभिमानाची भावना निर्माण केली. त्यानंतर "गड आला पण सिंह गेला" या प्रभावी नाटिकेचे सादरीकरण वरद दीक्षित, शिवराज पवार, विराज सोनटक्के, वरद पवार, शौर्य भोसले, माधव पवार, आरोही पवार आणि आराध्या कुंभार यांनी करून शिवाजी महाराजांच्या इतिहासातील अत्यंत हृदयस्पर्शी प्रसंग सजीव केला.

संत महिमाचे सादरीकरण इयत्ता चौथीतील सानवी पवार, ईश्वरी पवार, रिया कुंदेकर, श्रीशा पवार आणि अवनी माने यांनी अत्यंत भक्तिभावाने केले. भक्ती राठोड हिने "स्वराज्याचे तोरण बांधील राजानं शिवबा न" या गाण्यावर सादर केलेल्या नृत्याने प्रेक्षकांची विशेष दाद मिळवली. भाषण सत्रात अंशिका पवार, अनुश्री पवार, साई पवार, सई पवार, वरद दीक्षित, विराज सोनटक्के, श्रेया कुंदेकर, मनस्वी माने आणि प्रज्वल पवार यांनी शिवरायांचे विचार, त्यांचे सामाजिक योगदान, राष्ट्रभक्ती आणि स्वराज्याची संकल्पना यावर प्रेरणादायी विचार मांडले.

कार्यक्रमाचे मार्गदर्शन श्री. महादेव यादव यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्रीमती लीना पोटे यांनी केले. या कार्यक्रमाला ग्रामपंचायत आरफळचे सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, शिक्षक, पालकवर्ग तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आरफळमध्ये साजरा झालेला हा शिवजयंती उत्सव केवळ सांस्कृतिक कार्यक्रमापुरता मर्यादित न राहता, नव्या पिढीमध्ये शिवरायांचे विचार, मूल्ये आणि राष्ट्रप्रेम रुजवणारा ठरला. संपूर्ण गावाने एकत्र येत शिवरायांना मानाचा मुजरा अर्पण केल्याने उत्सवाला सामाजिक ऐक्याची आणि प्रेरणेची जोड लाभली. पुढील वर्षीही याच उत्साहाने आणि व्यापक सहभागातून शिवजयंती साजरी करण्याचा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl