कोट्यवधींच्या शौचालय प्रकल्पावर कोर्टाचा ठपका, तरी आम्हालाच ठेकेदारीचे धडे? – करहरमध्ये शिवेंद्रराजेंचा आक्रमक हल्लाबोल

कोट्यवधींच्या शौचालय प्रकल्पावर कोर्टाचा ठपका, तरी आम्हालाच ठेकेदारीचे धडे? – करहरमध्ये शिवेंद्रराजेंचा आक्रमक हल्लाबोल

✍️सादिक सैय्यद -

करहर (ता. जावली) : 

ठेकेदारीच्या आरोपांवर विरोधकांनी सुरू केलेल्या टीकेला थेट न्यायालयीन वास्तवासह प्रत्युत्तर देत करहर येथील प्रचारसभेत आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी जोरदार हल्लाबोल केला. नवी मुंबईतील मार्केट कमिटीच्या शौचालय बांधकाम प्रकल्पात कोट्यवधी रुपयांच्या गैरव्यवहारप्रकरणी थेट आरोपपत्र दाखल असल्याचा उल्लेख करत, “ज्यांच्यावर कोर्टात कारवाई सुरू आहे तेच आज आम्हाला नैतिकतेचे धडे देत आहेत,” असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला.

नाव न घेता शशिकांत शिंदे यांच्यावर थेट निशाणा साधताना शिवेंद्रराजे म्हणाले की, ज्यांच्या भ्रष्ट व्यवहारांचे कागद न्यायालयात आहेत, त्यांनी आधी स्वतःकडे पाहावे. आमच्यावर आरोप करण्याची पात्रता त्यांनी केव्हाच गमावली आहे. या प्रकरणातील सविस्तर चिठ्ठा-पिल्ला केरेगावचे आमदार महेश शिंदे यांच्याकडे असल्याचेही त्यांनी ठामपणे सांगितले, ज्यामुळे सभास्थळी एकच खळबळ उडाली.

आपल्या राजकीय वाटचालीचा उल्लेख करत शिवेंद्रराजे म्हणाले की, आजवर त्यांच्या आयुष्यात कधीही असे गलिच्छ आरोप झाले नाहीत. “मी कोट्यवधींचा ठेकेदार नाही. मी सर्वसामान्य माणूस आहे आणि सर्वसामान्यांसाठीच काम करतो. फरक एवढाच आहे की मी जनतेच्या दारात जातो, तर काही जण पैशाच्या दारातच फिरतात,” असा बोचरा टोला त्यांनी विरोधकांना लगावला.

कार्यकर्त्यांना उद्देशून बोलताना त्यांनी ठामपणे सांगितले की खोट्या आरोपांनी त्यांचा आवाज दाबता येणार नाही. न्यायालयीन कागदपत्रे स्वतःच बोलकी असतात. ज्यांच्यावर आरोपपत्र दाखल आहे, त्यांनी आधी जनतेला उत्तर द्यावे, अन्यथा निवडणुकीत जनता त्यांना अंतिम निकाल देईल, असा थेट इशाराही त्यांनी दिला. ‘सत्याची बाजू’, ‘भ्रष्टाचाराला चाप’ आणि ‘जनतेचा विश्वास’ अशा घोषणांनी करहरचे मैदान दणाणून गेले.

या आक्रमक प्रचारसभेला व्यासपीठावर वसंतराव मानरुमरे, दत्ता गावडे, गोरख महाडीक, जयदीप शिंदे, रेश्मा पोफळे यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते. सर्वांनी एकसुरात शिवेंद्रराजेंच्या भूमिकेला पाठिंबा देत, खोट्या आरोपांच्या राजकारणाला जावलीची जनता थारा देणार नाही, असा विश्वास व्यक्त केला.

सभेच्या समारोपात शिवेंद्रराजे म्हणाले की, आम्ही विकासाचे आणि भ्रष्टाचारविरोधी राजकारण करतो म्हणूनच आमच्यावर चिखलफेक केली जाते. मात्र जनता सुज्ञ आहे. ज्यांच्या नावावर कोर्टात आरोपपत्र आहे, त्यांना यावेळी जनता माफ करणार नाही, असा ठाम निर्धार व्यक्त करत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. या स्फोटक भाषणामुळे करहरमधील प्रचार अधिकच तापला असून, ठेकेदारीच्या आरोपांवर थेट न्यायालयीन वास्तव मांडत शिवेंद्रराजेंनी विरोधकांना आक्रमक आव्हान दिल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl