कोपरखैरणे येथील संवाद मेळाव्यात मोठा पक्षप्रवेश; रामेघर गावातील कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश, महाबळेश्वर तालुक्यात राजकीय हालचालींना वेग

कोपरखैरणे येथील संवाद मेळाव्यात मोठा पक्षप्रवेश; रामेघर गावातील कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश, महाबळेश्वर तालुक्यात राजकीय हालचालींना वेग

महाबळेश्वर प्रतिनिधी –

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाबळेश्वर तालुक्यातील राजकीय वातावरण तापत असताना मुंबईतील कोपरखैरणे येथे आयोजित महाबळेश्वर तालुका संवाद मेळाव्यात शिवसेनेला मोठे बळ मिळाले आहे. रामेघर गावातील विविध सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय असलेल्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केल्याने आगामी निवडणुकांच्या दृष्टीने हा मेळावा महत्त्वपूर्ण ठरला.

रामेघर गावचे विठ्ठल लक्ष्मण कदम दादा, सोमण पांडुरंग कदम, आनंद लक्ष्मण कदम, एकनाथ दगडू कदम तसेच रामेघर गावचे सरपंच सुनील दगडू कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आई तुळजाभवानी उत्कृष्ट मंडळाचे अध्यक्ष दीपक हरिबा कदम यांच्यासह शंकर भिवराम कदम, संजय लक्ष्मण कदम, सुनील विठ्ठल कदम, बजरंग लक्ष्मण कदम, राजेश महादेव कदम, गणेश तानाजी कदम, नारायण लक्ष्मण कदम, हरीश मारुती कदम व अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

हा पक्षप्रवेश नेरूळ येथील नगरसेवक श्री चंद्रकांतजी अगोंडे साहेब, युवा सेना जिल्हाप्रमुख (सातारा) विशालजी सकपाळ तसेच तालुका प्रमुख व मार्गदर्शक गणेशजी उतेकर साहेब यांच्या उपस्थितीत व हस्ते पार पडला. यावेळी शिवसेनेच्या विचारधारेवर आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. ना. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत, महाबळेश्वर तालुक्याच्या विकासासाठी एकत्रितपणे काम करण्याचा निर्धार नवप्रवेशित कार्यकर्त्यांनी केला.

संवाद मेळाव्यात बोलताना उपस्थित मान्यवरांनी सांगितले की, जिल्हा परिषद व पंचायत समिती स्तरावर सक्षम नेतृत्व आवश्यक असून, शिवसेना हीच विकासाभिमुख भूमिका घेऊन सातत्याने काम करत आहे. रामेघर गावातील कार्यकर्त्यांचा हा पक्षप्रवेश महाबळेश्वर तालुक्यात शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढवणारा ठरणार असून, आगामी निवडणुकांमध्ये याचा निश्चितच सकारात्मक परिणाम दिसून येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

या संवाद मेळाव्यामुळे महाबळेश्वर तालुक्यातील राजकीय घडामोडींना नवे वळण मिळाले असून, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत शिवसेनेची बाजू अधिक मजबूत झाल्याचे चित्र सध्या स्पष्ट होत आहे.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl