कुंभळजाई मातेच्या सान्निध्यात आज भक्तीचा जागर; करवीआळ्यात वार्षिक उत्सव व जागरण गोंधळ
कुंभळजाई मातेच्या सान्निध्यात आज भक्तीचा जागर; करवीआळ्यात वार्षिक उत्सव व जागरण गोंधळ
महाबळेश्वर | प्रतिनिधी
शिवकालीन सह्याद्रीच्या घनदाट जंगलात आपल्या लेकरांवर मायेची सावली ठेवणाऱ्या कुलस्वामिनी स्वयंभू श्री सावली जन्नी कुंभळजाई माता देवीचा वार्षिक उत्सव व जागरण गोंधळ सण आज शुक्रवार, दिनांक १३ फेब्रुवारी २०२६ रोजी करवीआळा येथील श्री सावली जन्नी कुंभळजाई माता मंदिरात भक्तिभावात संपन्न होत आहे. माघ कृ. ११, शके १९४७ या शुभ तिथीस हा उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा केला जात असून परिसरातील भाविकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.
आज सकाळी ६ ते ८ या वेळेत देवीचा अभिषेक विधी पार पडत असून संध्याकाळी ६ ते ७ या वेळेत मेटतळे ते करवीआळा पालखीचे भव्य आगमन होणार आहे. रात्री ७ ते ७.३० या वेळेत धुपारती व छबिना, त्यानंतर ७.३० ते ८ या वेळेत अहिल्यादेवी होळकर महिला बचत गटातर्फे हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रात्री ८ ते ९ या वेळेत मान्यवरांचे स्वागत करण्यात येणार असून रात्री ९ ते १२ या वेळेत देवीचा महाप्रसाद भाविकांसाठी खुला राहणार आहे.
या सोहळ्याचे आयोजन श्री सावली जन्नी कुंभळजाई माता मंदिर व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले असून जे.एम.सी.सी. क्रिकेट क्लब करवीआळा व अहिल्यादेवी होळकर महिला बचत गट करवीआळा यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहून देवीच्या दर्शनाचा लाभ घेत आहेत. करवीआळा व परिसरातील नागरिकांनी कुटुंबीयांसह या धार्मिक व सांस्कृतिक उत्सवात सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment