गोगवे येथे विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी.

गोगवे येथे विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी.

गोगवे प्रतिनिधी –

गोगवे, ता. महाबळेश्वर : गोगवे येथे विश्वकर्मा जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाच्या वातावरणात साजरी करण्यात आली. सुतारवाडी परिसरात आयोजित करण्यात आलेल्या या जयंती सोहळ्यास विभागातील ग्रामस्थ, शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. विश्वकर्मा भगवान यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.

यावेळी बोलताना सुतारवाडी येथील ग्रामस्थांनी आपण सर्व कट्टर शिवसैनिक असल्याचे स्पष्ट करत, येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू, अशी ठाम ग्वाही दिली. शिवसेनेच्या विजयात या भागातील ग्रामस्थांचे मोठे योगदान राहील, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.

कार्यक्रमात दादा सकपाळ आणि शिवसेना तालुका प्रमुख गणेश उतेकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. विश्वकर्मा जयंतीनिमित्त शुभेच्छा देत त्यांनी श्रमप्रतिष्ठा, कौशल्य आणि संघटनशक्तीचे महत्त्व अधोरेखित केले. समाजाने एकत्र येऊन सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय राहावे, असे आवाहन त्यांनी केले.

या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमास माजी आमदार दगडू दादा सकपाळ, शिवसेना तालुका प्रमुख गणेश उतेकर, विभाग प्रमुख लक्ष्मण कदम, संपर्क प्रमुख श्री. मंगेश सकपाळ, तापोळा विभाग प्रमुख श्री. लक्ष्मण कदम, राष्ट्रीय शिव स्वराज्य सेनेचे अध्यक्ष श्री. जितेंद्र दगडू (दादा) सकपाळ, काळेश्वरी बोट क्लबचे चेअरमन श्री. आनंद सकपाळ, अध्यक्ष श्री. तुकाराम सुतार, कार्याध्यक्ष श्री. राजेंद्र सुतार, सचिव श्री. सुभाष सुतार, खजिनदार श्री. गणपत सुतार यांच्यासह एकनाथ सुतार, शशिकांत सुतार, गणेश सुतार, शंकर सुतार, इंडियन आर्मीतील कु. गणेश सुरेश सुतार तसेच ग्रामस्थ व शिवसेना कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विश्वकर्मा भगवानांच्या जयघोषात आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देत हा जयंती सोहळा उत्साहात पार पडला.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl