बिग ब्रेकिंग : कुंभरोशी गणातून शिवसेनेचे संजय मोरे विजयी, राष्ट्रवादीच्या सचिन उतेकर यांचा पराभव
बिग ब्रेकिंग : कुंभरोशी गणातून शिवसेनेचे संजय मोरे विजयी, राष्ट्रवादीच्या सचिन उतेकर यांचा पराभव
महाबळेश्वर प्रतिनिधी
महाबळेश्वर तालुक्यातील कुंभरोशी गणात पंचायत समिती निवडणुकीच्या चौथ्या फेरीअखेर मोठा राजकीय उलटफेर झाला असून शिवसेनेचे उमेदवार संजय मोरे यांनी विजय मिळवला आहे. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या लढतीत शेवटच्या फेरीत संजय मोरे यांनी जोरदार मुसंडी मारत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सचिन उतेकर यांचा पराभव केला.
चौथ्या फेरीत शिवसेनेचे संजय मोरे यांना 774 मते मिळाली असून त्यांची एकूण मते 2272 झाली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिन उतेकर यांना या फेरीत 157 मते मिळाली असून त्यांची एकूण मते 2438 झाली आहेत. मात्र अंतिम टप्प्यात मतमोजणीच्या गणितात बदल झाल्याने संजय मोरे यांनी निर्णायक आघाडी घेत विजय निश्चित केला. भाजपचे सुरेश जाधव यांना 22 मते मिळून त्यांची एकूण मते 268 झाली आहेत. अपक्ष उमेदवार समीर चव्हाण यांना 15 मते मिळून एकूण 180, तर अपक्ष सनी मोरे यांना 1 मत मिळून एकूण 87 मते मिळाली आहेत.
संपूर्ण मतमोजणीदरम्यान कुंभरोशी गणात राष्ट्रवादी व शिवसेना यांच्यातील लढत अत्यंत अटीतटीची ठरली. प्रत्येक फेरीत आघाडी बदलत राहिल्याने वातावरण चांगलेच तापले होते. अखेर चौथ्या फेरीत शिवसेनेचे संजय मोरे यांनी निर्णायक झेप घेत विजय खेचून आणला. या निकालामुळे कुंभरोशी गणात शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले असून फटाके फोडून आणि घोषणा देत आनंद व्यक्त करण्यात आला.
या विजयामुळे महाबळेश्वर तालुक्यातील राजकीय समीकरणांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता असून आगामी काळात पंचायत समितीच्या सत्तास्थापनेत या निकालाची निर्णायक भूमिका राहणार आहे.
Comments
Post a Comment