महाशिवरात्रीनिमित्त महाबळेश्वरात भव्य रक्तदान शिबिर; समाजहितासाठी चर्मकार समाजाचा पुढाकार
महाशिवरात्रीनिमित्त महाबळेश्वरात भव्य रक्तदान शिबिर; समाजहितासाठी चर्मकार समाजाचा पुढाकार
महाबळेश्वर | प्रतिनिधी
महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त चर्मकार समाजाच्या वतीने महाबळेश्वर येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, दि. १५ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १०.३० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत हे शिबिर शंकर-पार्वती मंदिर, गवळी आळी, महाबळेश्वर येथे संपन्न होणार आहे.
“तुमच्या रक्ताच्या काही थेंबांनी तुम्ही एखाद्याला नवजीवन देऊ शकता” या प्रेरणादायी संदेशासह आयोजित या शिबिरातून समाजातील गरजू रुग्णांना वेळेवर रक्तपुरवठा व्हावा, तसेच रक्तदानाबाबत जनजागृती निर्माण व्हावी, हा प्रमुख उद्देश आहे. महाशिवरात्रीसारख्या पवित्र दिवशी सेवा आणि त्यागाच्या भावनेतून रक्तदान करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
या उपक्रमाचे आयोजन श्री. शंकर पार्वती ट्रस्ट, महाबळेश्वर, समस्त चर्मकार समाज, महाबळेश्वर आणि महाशिवरात्र उत्सव समिती, महाबळेश्वर यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. शिबिरासाठी आवश्यक वैद्यकीय सुविधा, प्रशिक्षित डॉक्टर व कर्मचारी तसेच सुरक्षिततेच्या सर्व उपाययोजना करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.
महाबळेश्वर आणि परिसरातील युवक, नागरिक, सामाजिक संस्था व भाविकांनी या रक्तदान शिबिरात मोठ्या संख्येने सहभागी होऊन समाजहिताच्या या उपक्रमात आपला मोलाचा वाटा उचलावा, असे आवाहन करण्यात आले आहे. अशा सेवाभावी उपक्रमांमुळे महाशिवरात्रीचा उत्सव अधिक अर्थपूर्ण ठरत असून, मानवतेचा खरा संदेश समाजात रुजवला जात आहे.
Comments
Post a Comment