देशपातळीवरील गौरवाचा मान : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित


देशपातळीवरील गौरवाचा मान : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

सातारा प्रतिनिधी –

बँकिंग क्षेत्रातील उल्लेखनीय, भरीव व आदर्श कामगिरीची दखल घेत सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मा. खासदार श्री. नितीन पाटील आणि बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांना राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. इव्हेंटलिस्ट कॉन्फरन्स आणि ई प्लस इंटेलेक्चुअल मीडिया या नामांकित संस्थेच्या वतीने देशभरातील बँकिंग क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संस्था व व्यक्तींना सन्मानित करण्यात येते. याच पुरस्कार वितरण सोहळ्यात सातारा जिल्हा बँकेच्या कार्याचा गौरव करण्यात आला.

या कार्यक्रमात इंडियन बँकिंग असोसिएशनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री. गोपाल भगत यांच्या शुभहस्ते बँकेचे अध्यक्ष मा. खा. श्री. नितीन पाटील यांना “सर्वोत्कृष्ट चेअरमन” पुरस्कार प्रदान करण्यात आला, तर पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी संयुक्त पोलीस आयुक्त मा. श्री. संजय शिंदे यांच्या हस्ते डॉ. राजेंद्र सरकाळे यांना “सर्वोत्कृष्ट मुख्य कार्यकारी अधिकारी” या पुरस्काराने गौरविण्यात आले. या पुरस्कार वितरण सोहळ्याचे उद्घाटन रिझर्व्ह बँक व नाबार्डचे संचालक मा. श्री. सतीश मराठे यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक सूचना, बँकिंग रेग्युलेशन अ‍ॅक्ट आणि त्यांची प्रभावी अंमलबजावणी याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले.

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कामकाज रिझर्व्ह बँक, नाबार्ड यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार तसेच बँकिंग रेग्युलेशन अ‍ॅक्ट व महाराष्ट्र राज्य सहकारी कायद्यातील तरतुदींनुसार पारदर्शकपणे राबविले जाते. जिल्ह्याची वैभवशाली सहकार परंपरा जपण्यासाठी अध्यक्ष मा. खा. श्री. नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक मंडळाने ठरविलेली स्पष्ट ध्येय-धोरणे, त्यांची प्रभावी अंमलबजावणी, जिल्ह्यातील शेतकरी व सभासदांचा बँकेवरील अढळ विश्वास, आर्थिक शिस्त, काटकसरीचा कारभार आणि विकासाभिमुख दृष्टीकोन यामुळे बँक सातत्याने प्रगतीपथावर आहे. खर्चात काटकसर, काटकसरीतून बचत, बचतीतून समृद्धी आणि समृद्धीतून स्वावलंबन हा सहकाराचा मूलमंत्र प्रत्यक्षात उतरवत बँक विकासाची घोडदौड करत आहे. या सर्वंकष आणि आदर्श कार्यपद्धतीची दखल घेत अध्यक्ष मा. खा. श्री. नितीन पाटील यांना “उत्कृष्ट अध्यक्ष” या सन्मानाने गौरविण्यात आले.

या पुरस्काराबद्दल प्रतिक्रिया देताना मा. खा. श्री. नितीन पाटील म्हणाले की, सहकारी बँकांचे देशाच्या ग्रामीण विकासात मोलाचे योगदान आहे. सातारा जिल्हा बँकेने पारदर्शक कारभार, उत्कृष्ट प्रशासन आणि आधुनिक कार्यप्रणालीच्या बळावर राज्यासह देशपातळीवर नावलौकिक मिळविला आहे. हा पुरस्कार म्हणजे बँकेच्या विश्वासार्हतेवर व कार्यक्षमतेवर मिळालेली राष्ट्रीय पातळीवरील शिक्कामोर्तब असल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी देश-विदेशातील तीसपेक्षा अधिक देशांचा बँकिंग व शेतीविषयक अभ्यास दौरा केला असून शेतीविषयक पाच पुस्तके त्यांनी प्रकाशित केली आहेत. बँकेच्या माध्यमातून विविध विकासात्मक योजना प्रभावीपणे राबवून शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवत त्यांचा सर्वांगीण विकास, आर्थिक सक्षमीकरण आणि ग्रामीण जीवनमान उंचावण्यासाठी त्यांनी विशेष योगदान दिले आहे. पारंपारिक शेतीला तंत्रज्ञानाची जोड, कृषी उत्पादनापासून निर्यातीपर्यंतची साखळी मजबूत करण्यासाठी त्यांनी आपल्या लिखाणातून व प्रत्यक्ष कामातून मार्गदर्शन केले आहे. शेतकरी सभासदांच्या हितासाठी राबविलेल्या या सर्वंकष उपक्रमांची दखल घेत त्यांना “उत्कृष्ट मुख्य कार्यकारी अधिकारी” म्हणून सन्मानित करण्यात आले.

यावेळी मा. श्री. गोपाल भगत यांनी सातारा जिल्हा बँकेच्या सातत्यपूर्ण आणि उत्कृष्ट कामगिरीचे विशेष कौतुक केले, तर मा. श्री. संजय शिंदे यांनी देशभरात सातारा जिल्हा बँकेची गौरवशाली परंपरा असून ती बँकिंग क्षेत्रातील आदर्श बँक म्हणून ओळखली जात असल्याचा उल्लेख केला.

या कार्यक्रमास संस्थेचे संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक मा. श्री. जाहिद सिद्धिकी, श्री. प्रेषित देशमुख, ज्युरी सदस्य श्री. प्रमोद कर्नाड व श्री. यशवंत पाटील, बँकेचे मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी श्री. प्रशांत मांढरे, श्री. संभाजी यादव आदी मान्यवर उपस्थित होते. या राष्ट्रीय सन्मानाबद्दल बँकेचे ज्येष्ठ संचालक श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर, महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री मा. ना. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, मदत व पुनर्वसन मंत्री मा. ना. श्री. मकरंद पाटील, मा. खा. श्रीमंत छ. उदयनराजे भोसले, माजी सहकार मंत्री मा. श्री. बाळासाहेब पाटील, उपाध्यक्ष श्री. अनिल देसाई तसेच सर्व संचालकांनी अभिनंदन करून बँकेच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl