बिग ब्रेकिंग : तळदेव गणात दुसऱ्या फेरीतही शिंदे गटाचीच सरशी, पंचायत समितीत संजय शेलारांची भक्कम आघाडी; जिल्हा परिषदेत अजित संकपाळ निर्णायक टप्प्यावर
बिग ब्रेकिंग : तळदेव गणात दुसऱ्या फेरीतही शिंदे गटाचीच सरशी, पंचायत समितीत संजय शेलारांची भक्कम आघाडी; जिल्हा परिषदेत अजित संकपाळ निर्णायक टप्प्यावर
महाबळेश्वर प्रतिनिधी
महाबळेश्वर तालुक्यातील तळदेव गणात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या मतमोजणीच्या दुसऱ्या फेरीचा अधिकृत निकाल जाहीर झाला असून या फेरीतही एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेने आपली आघाडी अधिक मजबूत केली आहे. पंचायत समिती व जिल्हा परिषद दोन्ही ठिकाणी शिंदे गटाच्या उमेदवारांनी मोठे मताधिक्य मिळवत विजयाच्या दिशेने ठोस पावले टाकली आहेत.
पंचायत समिती गणात दुसऱ्या फेरीत राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय उतेकर यांना 524 मते मिळाली असून त्यांची एकूण मते 1679 झाली आहेत. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेनेचे अभिषेक शिंदे यांना 34 मते मिळून त्यांची एकूण मते 159 झाली आहेत. एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेचे संजय शेलार यांनी या फेरीत 686 मते मिळवत एकूण 2839 मतांची भक्कम आघाडी घेतली आहे. भाजपचे गोविंद सपकाळ यांना 89 मते मिळून त्यांची एकूण मते 347 झाली आहेत. दुसऱ्या फेरीअखेर पंचायत समितीत संजय शेलार यांची आघाडी स्पष्ट असून विजय जवळपास निश्चित मानला जात आहे.
जिल्हा परिषद गटातही दुसऱ्या फेरीत शिवसेनेचे अजित संकपाळ यांनी 930 मते मिळवत एकूण 6087 मतांपर्यंत मजल मारली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय गायकवाड यांना 558 मते मिळून त्यांची एकूण मते 4174 झाली आहेत. भाजपचे सुभाष सोंडकर यांना 52 मते मिळून त्यांची एकूण मते 528 झाली आहेत. या फेरीअखेर अजित संकपाळ यांनी संजय गायकवाड यांच्यावर तब्बल 1913 मतांची आघाडी घेतल्याने जिल्हा परिषदेत शिवसेनेचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे.
तळदेव गणात पहिल्या फेरीपासूनच शिंदे गटाची सरशी दिसून येत असून दुसऱ्या फेरीत ती अधिक ठळक झाली आहे. त्यामुळे परिसरात शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून विजयाचे जल्लोष सुरू झाले आहेत. मात्र अंतिम अधिकृत निकाल जाहीर होईपर्यंत सर्वांचे लक्ष पुढील फेऱ्यांकडे लागले आहे.
Comments
Post a Comment