बिग ब्रेकिंग : तळदेव गटावर शिवसेना शिंदे गटाचा झेंडा, पंचायत समिती व जिल्हा परिषद दोन्ही ठिकाणी दणदणीत विजयी

बिग ब्रेकिंग : तळदेव गटावर शिवसेना शिंदे गटाचा झेंडा, पंचायत समिती व जिल्हा परिषद दोन्ही ठिकाणी दणदणीत विजयी 

महाबळेश्वर प्रतिनिधी 

महाबळेश्वर तालुक्यातील तळदेव गटाचा अंतिम निकाल हाती आला असून पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या दोन्ही ठिकाणी शिवसेना शिंदे गटाने निर्णायक विजय मिळवला आहे. अत्यंत चुरशीच्या आणि बहुप्रतीक्षित लढतीत अखेर शिंदे गटाच्या उमेदवारांनी बाजी मारत तळदेव गटावर आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.

पंचायत समिती गटात शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार संजय शेलार यांनी 4282 मते मिळवत दणदणीत विजय संपादन केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय उतेकर यांना 2272 मते मिळाली असून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेनेचे अभिषेक शिंदे यांना 186 मते मिळाली आहेत. भाजपचे गोविंद सकपाळ यांना 396 मते मिळाली आहेत. संजय शेलार यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवल्याने तळदेव गटात शिंदे गटाचे वर्चस्व स्पष्ट झाले आहे.

जिल्हा परिषद गटातही शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार अजित संकपाळ यांनी 7673 मते मिळवत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय गायकवाड यांचा पराभव केला आहे. संजय गायकवाड यांना 4673 मते मिळाली असून भाजपचे सुभाष सोनकर यांना 557 मते मिळाली आहेत. जिल्हा परिषद गटात अजित संकपाळ यांनी सुमारे 3000 मतांची भक्कम आघाडी घेत विजय मिळवला आहे.

तळदेव गटात पंचायत समिती व जिल्हा परिषद या दोन्ही ठिकाणी मिळालेल्या या दणदणीत विजयामुळे शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. निकाल जाहीर होताच फटाके फोडून, ढोल-ताशांच्या गजरात आणि जोरदार घोषणाबाजी करत जल्लोष करण्यात आला. या विजयामुळे महाबळेश्वर तालुक्यातील राजकीय समीकरणांवर मोठा परिणाम होणार असून आगामी सत्तास्थापनेत शिवसेना शिंदे गटाची भूमिका निर्णायक ठरणार आहे.

तळदेव गटातील हा निकाल संपूर्ण तालुक्याच्या राजकारणाला नवी दिशा देणारा ठरत असून निवडणूक प्रक्रियेत सहभागी सर्व उमेदवार, कार्यकर्ते आणि मतदारांचे लक्ष वेधून घेणारा ठरला आहे.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl