महाबळेश्वर गिरिस्थान परिषदेत विविध समित्यांची रचना; सभापती व सदस्यांची निवड जाहीर
महाबळेश्वर गिरिस्थान परिषदेत विविध समित्यांची रचना; सभापती व सदस्यांची निवड जाहीर
महाबळेश्वर प्रतिनिधी :
महाबळेश्वर गिरिस्थान परिषदेच्या कार्यालयात समिती सदस्य नामनिर्देशन, विविध विषय समित्यांच्या सभापतींची निवड तसेच स्थायी समितीची रचना करण्यासाठी पीठासीन अधिकारी तथा मुख्याधिकारी योगेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा पार पडली. राष्ट्रगीताने सभेची सुरुवात करण्यात आली. यावेळी एनसीपीचे गटनेते अॅड. संजय जंगम व गिरिवन नगर विकास आघाडीचे गटनेते कुमार शिंदे यांनी विविध विषय समित्यांसाठी सदस्यांचे नामनिर्देशन पत्र पीठासीन अधिकारी यांच्याकडे सुपुर्द केले.
नामनिर्देशन पत्रांची छाननी केल्यानंतर पीठासीन अधिकारी योगेश पाटील यांनी विविध समित्यांच्या सभापती व सदस्यांची नावे जाहीर केली. शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक कार्य समितीच्या सभापतीपदी रोहित बबन ढेबे यांची निवड करण्यात आली असून सदस्य म्हणून पल्लवी संदीप गोंढाळकर, विद्या शरद बावळेकर व कुमार गोरखनाथ शिंदे यांची निवड झाली आहे. स्वच्छता, वैद्यकीय आणि सार्वजनिक आरोग्य समितीच्या सभापतीपदी संजय बाळकृष्ण जंगम यांची निवड करण्यात आली असून सदस्य म्हणून राहुल प्रकाश पिसाळ, प्रियंका अक्षय वायदंडे व नीता आकाश झाळे यांची निवड करण्यात आली आहे.
पाणीपुरवठा व जलनिस्तारण समितीच्या सभापतीपदी नासिरभाई मुलानी यांची निवड झाली असून सदस्य म्हणून संतोष बबन शिंदे, संतोष मारुती आखाडे व राजू इस्माईल नालबंद यांची निवड करण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम, नियोजन व विकास समितीच्या सभापतीपदी अफजल मुबारक सुतार यांची निवड झाली असून सदस्य म्हणून संतोष मारुती आखाडे, विमल पांडुरंग पारटे व विमल पांडुरंग बिरामणे यांची निवड करण्यात आली आहे. महिला व बालक कल्याण समितीच्या अध्यक्षपदी संगीता दत्तात्रेय वाडकर यांची निवड झाली असून सदस्य म्हणून विद्या शरद बावळेकर, रेशमा किरण ढेबे व शबाना अल्ताफ मानकर यांची निवड करण्यात आली आहे.
स्थायी समितीच्या पदसिद्ध सभापतीपदी नगराध्यक्ष सुनील लक्ष्मण शिंदे यांची निवड झाली असून सदस्य म्हणून नासिरभाई मुलानी, संजय जंगम, रोहित ढेबे, अफजल सुतार व संगीता दत्तात्रेय वाडकर यांची निवड करण्यात आली आहे. या संपूर्ण सभेदरम्यान पीठासीन अधिकारी योगेश पाटील, नगराध्यक्ष सुनील शिंदे, उपनगराध्यक्ष नासिर मुलानी यांच्यासह सर्व सदस्य, कार्यालयीन कर्मचारी व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment