मेटगुताडमध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा सखोल आढावा; ग्रामविकासासाठी कृतीशील चर्चा
मेटगुताडमध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा सखोल आढावा; ग्रामविकासासाठी कृतीशील चर्चा
मेटगुताड प्रतिनिधी –
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत गुरुवार दिनांक १२ फेब्रुवारी २०२६ रोजी मौजे मेटगुताड येथे पंचायत समिती वाई अंतर्गत विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त पाहणी करून अभियानाच्या अंमलबजावणीचा सविस्तर आढावा घेतला. या पाहणी दरम्यान ग्रामपंचायतीच्या दप्तरी कामकाजासह विकासकामांची प्रत्यक्ष तपासणी करण्यात आली तसेच ग्रामस्थांशी संवाद साधून पुढील टप्प्यातील विकासाच्या दिशा ठरविण्यात आल्या.
या पाहणी पथकात विस्तार अधिकारी ग्रामपंचायत श्री. राहुल हजारे, विस्तार अधिकारी (कृषी) श्री. नारायण पवार, आरोग्य सहाय्यक श्री. नरेंद्र सणस (THO कार्यालय), ICDS पर्यवेक्षिका श्रीमती आशा भोसले, तसेच तालुका व्यवस्थापक श्री. सौरभ फरांदे यांचा समावेश होता. अधिकाऱ्यांनी अभियान अंतर्गत आतापर्यंत राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांचा सविस्तर आढावा घेत ग्रामपंचायत दप्तरी नोंदींची तपासणी केली. यावेळी अभियानाशी संबंधित मुद्देसूद प्रश्नावलीवर चर्चा करून योग्य त्या मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या.
ग्रामस्थांशी थेट संवाद साधत गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आरोग्य, स्वच्छता, पाणीपुरवठा, शिक्षण, कृषी विकास, महिला व बालकल्याण, पोषण आहार, स्वच्छ भारत अभियान तसेच विविध शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी कशी करता येईल, यावर सखोल चर्चा करण्यात आली. गावाचा विकास अधिक गतीने कसा साधता येईल, उपलब्ध संसाधनांचा योग्य वापर कसा करावा, लोकसहभाग कसा वाढवावा आणि शासनाच्या योजनांचा लाभ तळागाळातील घटकांपर्यंत कसा पोहोचवावा, यावर अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी सरपंच श्री. भिकन बावळेकर, ग्रामपंचायत अधिकारी श्री. वैभव काळे, आशा सेविका, अंगणवाडी सेविका व मदतनिस, मुख्याध्यापक, सीआरपी, कृषीसखी, ग्रामपंचायत कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामपंचायत अधिकारी श्री. वैभव काळे यांनी अभियानाअंतर्गत आजपर्यंत करण्यात आलेल्या विविध विकासकामांची, उपक्रमांची व योजनांची सविस्तर माहिती अधिकाऱ्यांना दिली.
पाहणी दरम्यान स्वच्छता व्यवस्थापन, आरोग्य सेवा, मातृ व बाल संगोपन, शालेय शिक्षणाची गुणवत्ता, कृषी विकासासाठी नवनवीन उपक्रम, पाणी व्यवस्थापन, सार्वजनिक सुविधा आणि डिजिटल दप्तरीकरण यावर विशेष भर देण्यात आला. या सर्व बाबींमध्ये सुधारणा करून गावाचा सर्वांगीण विकास साधण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या माध्यमातून गावपातळीवर नियोजनबद्ध, पारदर्शक आणि लोकसहभागातून विकास घडवून आणण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अशा पाहणी व संवादात्मक बैठका अत्यंत उपयुक्त ठरत असल्याचे मत यावेळी उपस्थितांनी व्यक्त केले. या अभियानामुळे मेटगुताड गावाचा विकास अधिक वेगाने आणि सर्वसमावेशक पद्धतीने होईल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला.
Comments
Post a Comment