शिवजयंतीनिमित्त प्रतापगड परिसरात मावळ्यांचे भव्य रक्तदान शिबिर — मानवसेवेचा प्रेरणादायी उपक्रम


शिवजयंतीनिमित्त प्रतापगड परिसरात मावळ्यांचे भव्य रक्तदान शिबिर — मानवसेवेचा प्रेरणादायी उपक्रम

प्रतापगड प्रतिनिधी –

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त गुरुवार, दिनांक १९ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रतापगड परिसरात मावळ्यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. “रक्तदान हेच श्रेष्ठ दान” या प्रेरणादायी संदेशाला अनुसरून आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम समाजात मानवतेची भावना वृद्धिंगत करणारा ठरणार आहे.

या रक्तदान शिबिराचे आयोजन पर्यटक गाईड सामाजिक संस्था, प्रतापगड, सर्व ग्रुप ग्रामपंचायत कुंभरोशी व प्रतापगड, प्राथमिक आरोग्य केंद्र तळदेव तसेच महाबळेश्वर तालुक्यातील सर्व शिवभक्तांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. या उपक्रमासाठी इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे बेल एअर ब्लड सेंटर, वाई यांचे मोलाचे सहकार्य लाभणार आहे.

सकाळी ७ वाजल्यापासून दुपारी ३ वाजेपर्यंत हे रक्तदान शिबिर दोन ठिकाणी — भवानी माता मंदिर परिसर, प्रतापगड तसेच श्री क्लिनिक, डॉ. महेंद्र भिलारे, कुंभरोशी येथे एकाच वेळी पार पडणार आहे. शिवजयंतीच्या पावन पर्वावर समाजोपयोगी उपक्रमात सहभाग घेण्याची ही संधी असून, जास्तीत जास्त शिवभक्तांनी पुढे येऊन रक्तदान करावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

रक्तदानामुळे अनेक गरजू रुग्णांचे प्राण वाचू शकतात. त्यामुळे हा उपक्रम केवळ एक कार्यक्रम न राहता समाजासाठी जीवनदायी ठरणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना आणि कार्याला अभिवादन करत मानवसेवेचा हा व्रतसंकल्प सर्व शिवप्रेमींनी प्रत्यक्ष कृतीत उतरवावा, असे आवाहन करण्यात आले आहे. सर्व नागरिकांनी, युवकांनी आणि शिवभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या रक्तदान शिबिरात सहभागी व्हावे, अशी नम्र विनंती आयोजकांनी केली आहे.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl