बिग ब्रेकिंग : कुंभरोशी गणात राष्ट्रवादी आघाडीचा डंका, दुसऱ्या फेरीअखेर संजय गायकवाड व सचिन उतेकरांची भक्कम आघाडी

बिग ब्रेकिंग : कुंभरोशी गणात राष्ट्रवादी आघाडीचा डंका, दुसऱ्या फेरीअखेर संजय गायकवाड व सचिन उतेकरांची भक्कम आघाडी

महाबळेश्वर प्रतिनिधी 

महाबळेश्वर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 च्या मतमोजणीच्या दुसऱ्या फेरीअखेर कुंभरोशी गणात राष्ट्रवादी आघाडीने आपली पकड अधिक मजबूत केली आहे. तळदेव गट व कुंभरोशी गणातील एकूण दहा मतदान केंद्रांवरील मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर जिल्हा परिषद व पंचायत समिती दोन्ही ठिकाणी राष्ट्रवादी आघाडी स्पष्टपणे पुढे असल्याचे चित्र समोर आले आहे.

जिल्हा परिषद गटासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय रामचंद्र गायकवाड यांनी दुसऱ्या फेरीत 641 मते मिळवत एकूण 1725 मतांचा टप्पा ओलांडला आहे. शिवसेनेचे अजित रामचंद्र संकपाळ यांना या फेरीत 587 मते मिळून एकूण 1469 मते झाली असून भाजपचे सुभाष महादेव सोळंकर यांना 128 मते मिळून त्यांची एकूण मते 412 वर पोहोचली आहेत. नोटाला या फेरीत 15 मते मिळाली असून एकूण नोटा मते 30 झाली आहेत. दोन फेऱ्यांच्या एकत्रित निकालानंतर संजय गायकवाड यांनी अजित संकपाळ यांच्यावर 256 मतांची आघाडी घेतली असून ही आघाडी निर्णायक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पंचायत समिती गणातही राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिन श्रीरंग उतेकर यांनी दुसऱ्या फेरीत 712 मते मिळवत एकूण 2011 मतांची भक्कम आघाडी घेतली आहे. शिवसेनेचे संजय हरिश्चंद्र मोरे यांना 464 मते मिळून त्यांची एकूण मते 1125 झाली आहेत. अपक्ष उमेदवार समीर मधुकर चव्हाण यांना 130 मते मिळून एकूण 148 मते झाली आहेत. भाजपचे सुरेश हरिभाऊ जाधव यांना 33 मते मिळून त्यांची एकूण मते 227 झाली असून अपक्ष सनी अशोक मोरे यांना 17 मते मिळून त्यांची एकूण मते 84 झाली आहेत. नोटाला या फेरीत 15 मते मिळून एकूण 31 मते नोंदवली गेली आहेत. दुसऱ्या फेरीअखेर सचिन उतेकर यांनी संजय मोरे यांच्यावर तब्बल 886 मतांची आघाडी घेतली असून पंचायत समितीत राष्ट्रवादी आघाडी जवळपास विजयी वाटचालीत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

दुसऱ्या फेरीत एकूण 1371 मतांची मोजणी पूर्ण झाली असून आतापर्यंत जिल्हा परिषदेसाठी 3636 तर पंचायत समितीसाठी 3626 मते मोजली गेली आहेत. पहिल्या फेरीतील आघाडीनंतर दुसऱ्या फेरीतही राष्ट्रवादी आघाडीने आघाडी अधिक वाढवल्याने कुंभरोशी गणात राष्ट्रवादी समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. मात्र अजूनही काही फेऱ्यांची मतमोजणी बाकी असल्याने अंतिम निकालासाठी सर्वांचे लक्ष पुढील फेऱ्यांकडे लागले आहे.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl