ली-मेरेडियन हॉटेलमध्ये महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग; संशयित सेल्स असिस्टंट मॅनेजरविरोधात गुन्हा दाखल


ली-मेरेडियन हॉटेलमध्ये महिला कर्मचाऱ्याशी गैरवर्तन; संशयित कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल

महाबळेश्वर प्रतिनिधी : 

येथील नामांकित ली-मेरेडियन हॉटेलमध्ये कार्यरत असलेल्या एका महिला कर्मचाऱ्याशी गैरवर्तन झाल्याची गंभीर घटना समोर आली असून, या प्रकरणी हॉटेलमधीलच एका संशयित कर्मचाऱ्याविरोधात महाबळेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


फिर्यादी महिला गेल्या तीन महिन्यांपासून संबंधित हॉटेलमध्ये वेलनेस मॅनेजर म्हणून कार्यरत आहे. जानेवारी महिन्यात दोन वेळा हॉटेल परिसरात काम करत असताना संशयिताने तिच्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप तिने तक्रारीत केला आहे. या प्रकारामुळे तिला मानसिक त्रास सहन करावा लागल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.


या घटनेबाबत फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून २१ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी महाबळेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार शेलार करत असून, पोलीस निरीक्षक बापूसाहेब सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. तसेच या गुन्ह्यात ई-साक्षी प्रणालीअंतर्गत SID तयार करण्यात आली आहे.


पर्यटननगरी महाबळेश्वरमधील नामांकित हॉटेलमध्ये घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलिसांकडून सखोल तपास सुरू असून, दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.


— दक्ष क्रांती | माझं गाव, माझी बातमी




Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl