बिग ब्रेकिंग : तळदेव गणात पंचायत समितीसाठी पहिल्याच फेरीत शिंदे गटाची जोरदार आघाडी; जिल्हा परिषदेतही अजित संकपाळ पुढे

बिग ब्रेकिंग : तळदेव गणात पंचायत समितीसाठी पहिल्याच फेरीत शिंदे गटाची जोरदार आघाडी; जिल्हा परिषदेतही अजित संकपाळ पुढे

महाबळेश्वर प्रतिनिधी

महाबळेश्वर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या मतमोजणीदरम्यान तळदेव गणातून पंचायत समितीसाठी पहिल्या फेरीचा अधिकृत निकाल जाहीर झाला असून येथे एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेचे उमेदवार संजय शेलार यांनी पहिल्याच फेरीत जोरदार मुसंडी मारत निर्णायक आघाडी घेतल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. या निकालामुळे तळदेव गणातील राजकीय समीकरणे स्पष्टपणे बदलताना दिसत आहेत.

पंचायत समितीच्या पहिल्या फेरीत एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेचे संजय शेलार यांनी तब्बल 1953 मते मिळवत भक्कम आघाडी घेतली आहे. भाजपचे उमेदवार गोविंद सपकाळ यांना 258 मते मिळाली असून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे अभिषेक शिंदे यांना 125 मते मिळाली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय उतेकर यांना केवळ 11 मते मिळाली असून पहिल्याच फेरीत शिंदे गटाने मोठे वर्चस्व प्रस्थापित केल्याचे स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, जिल्हा परिषद गटातही तळदेव गणातून मोठी चुरस पाहायला मिळत असून शिवसेनेचे अजित संकपाळ यांनी या फेरीत 2208 मते मिळवत एकूण 5157 मतांचा टप्पा गाठला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय गायकवाड यांना या फेरीत 1293 मते मिळाली असून त्यांची एकूण मते 3616 झाली आहेत. भाजपचे सुभाष सोंडकर यांना 36 मते मिळून त्यांची एकूण मते 467 झाली आहेत. आतापर्यंतच्या मतमोजणीत अजित संकपाळ यांनी संजय गायकवाड यांच्यावर मोठी आघाडी घेतल्याने जिल्हा परिषद गटात शिवसेनेचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे.

तळदेव गणातील पहिल्या फेरीच्या निकालामुळे परिसरात राजकीय वातावरण चांगलेच तापले असून शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. फटाके फोडून, जल्लोष करत आणि एकमेकांना शुभेच्छा देत आनंद व्यक्त केला जात आहे. पुढील फेऱ्यांमध्ये मताधिक्य किती वाढते याकडे सर्वांचे लक्ष लागले असून अंतिम निकालाबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl