भिलार गणात राष्ट्रवादी काँग्रेसची जोरदार मुसंडी; पहिल्याच फेरीत निर्णायक आघाडी
भिलार गणात राष्ट्रवादी काँग्रेसची जोरदार मुसंडी; पहिल्याच फेरीत निर्णायक आघाडी
महाबळेश्वर प्रतिनिधी
महाबळेश्वर तालुक्यातील राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या भिलार गणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जोरदार मुसंडी मारत निवडणूक निकालांच्या पहिल्याच फेरीत आपले वर्चस्व स्पष्ट केले आहे. पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या दोन्ही स्तरांवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी मोठी आघाडी घेतल्याने परिसरात राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वंदना भिलारे यांनी पहिल्या फेरीअखेर 3412 मते मिळवत प्रतिस्पर्ध्यांवर भक्कम आघाडी घेतली आहे. भाजपच्या सुप्रिया भिलारे यांना 222 मते मिळाली असून शिवसेनेच्या पुनम गोळे यांना 678 मते मिळाली आहेत. वंदना भिलारे यांनी घेतलेली ही मोठी आघाडी राष्ट्रवादी काँग्रेससाठी उत्साहवर्धक ठरत असून विजयाच्या दिशेने त्यांची वाटचाल अधिक भक्कम झाली आहे.
जिल्हा परिषद निवडणुकीतही राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय केळगणे यांनी पहिल्याच फेरीत 7452 मते मिळवत प्रचंड आघाडी घेतली आहे. भाजपच्या रंजना कदम यांना 2353 मते मिळाली असून शिवसेनेच्या प्रदीप चपटे यांना 1073 मते मिळाली आहेत. संजय केळगणे यांनी मिळवलेली ही निर्णायक आघाडी पाहता भिलार गणात राष्ट्रवादी काँग्रेसचे पारडे जड असल्याचे स्पष्ट होत आहे.
मतमोजणी सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून विजयाचा विश्वास व्यक्त केला जात आहे. भिलार गणातील हा कल महाबळेश्वर तालुक्यातील एकूण राजकीय समीकरणांवर मोठा परिणाम करणारा ठरणार असल्याचे बोलले जात आहे.
Comments
Post a Comment