शिवसेनेत मोठी संघटनात्मक जबाबदारी : माजी आमदार दगडू सपकाळ यांची पश्चिम महाराष्ट्र विभागीय संपर्कप्रमुखपदी नियुक्ती
शिवसेनेत मोठी संघटनात्मक जबाबदारी : माजी आमदार दगडू सपकाळ यांची पश्चिम महाराष्ट्र विभागीय संपर्कप्रमुखपदी नियुक्ती
सातारा प्रतिनिधी :
वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या विचारांच्या प्रेरणेतून, शिवसेना मुख्य नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार माजी आमदार दगडू सपकाळ यांची शिवसेना पक्षाच्या विभागीय संपर्कप्रमुखपदी (कार्यक्षेत्र : पश्चिम महाराष्ट्र) नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती एक वर्ष कालावधीसाठी असून पक्ष संघटन मजबूत करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाकडून जारी करण्यात आलेल्या अधिकृत नियुक्ती पत्रानुसार, दगडू सपकाळ यांनी पश्चिम महाराष्ट्र विभागात पक्ष संघटन वाढविणे, कार्यकर्त्यांना बळ देणे, जनसंपर्क वाढविणे आणि हिंदुत्ववादी विचारांचा प्रभावी प्रचार व प्रसार करणे, ही जबाबदारी पार पाडायची आहे. शिवसेनेच्या वाढीसाठी सर्वांना सोबत घेऊन एकसंघपणे काम करतील, असा विश्वास पक्ष नेतृत्वाने व्यक्त केला आहे.
राजकीय व सामाजिक क्षेत्रात दीर्घ अनुभव असलेल्या दगडू सपकाळ यांच्या नियुक्तीमुळे पश्चिम महाराष्ट्रात शिवसेनेची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत होईल, असा विश्वास पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे. त्यांच्या नियुक्तीचे सर्व स्तरांतून स्वागत होत असून, अनेक पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि शिवसैनिकांनी त्यांचे अभिनंदन करत पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
या नियुक्तीमुळे आगामी काळात पश्चिम महाराष्ट्रात शिवसेनेची ताकद वाढेल, संघटनात्मक हालचालींना गती मिळेल आणि जनतेशी थेट संवाद साधत पक्ष अधिक प्रभावीपणे कार्य करेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
Comments
Post a Comment