महाबळेश्वर आगार एसटी कामगार संघटनेच्या अध्यक्षपदी संदीप गाडवे; नुतन कार्यकारिणीची सर्वानुमते निवड
महाबळेश्वर आगार एसटी कामगार संघटनेच्या अध्यक्षपदी संदीप गाडवे; नुतन कार्यकारिणीची सर्वानुमते निवड
प्रतापगड प्रतिनिधी –
महाबळेश्वर आगार एसटी कामगार संघटनेच्या सन २०२६ च्या आगार कार्यकारिणीच्या निवडीसाठी आयोजित करण्यात आलेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्षपदी संदीप सुभाष गाडवे (वाहक) यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. सचिवपदी संतोष सुहास सावंत (वाहक) तर कार्याध्यक्षपदी सुदर्शन मोहन शिंदे (चालक) यांची निवड करण्यात आली आहे.
या निवड प्रक्रियेसाठी आयोजित सभेला कामगार संघटनेचे केंद्रीय उपाध्यक्ष व विभागीय अध्यक्ष शिवाजीराव देशमुख, विभागीय सचिव अजित पिसाळ, विभागीय कार्याध्यक्ष नाना घोणे, विभागीय खजिनदार प्रकाश पाटील, सातारा आगार अध्यक्ष जनक जाधव, सातारा आगार सचिव युवराज भारती, सुशांत मोहिते यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली निवड प्रक्रिया पार पडली.
नुतन कार्यकारिणीत उपाध्यक्षपदी विठ्ठल चव्हाण (वाहतूक नियंत्रक), अमोल वडगावे (वाहतूक नियंत्रक), राजाराम भिलारे (चालक), दिलीप बोराटे (चालक), केशव घाडगे (चालक) आणि वर्षा लोहकरे (वाहक) यांची निवड करण्यात आली. सहसचिवपदी अजित जमदाडे (वरिष्ठ लिपिक), योगेश पारखी (वाहक), सुधीर राजपुरे (वाहक), योगेश शेडगे (वाहक), अमोल डुबल (चालक), नितीन गायकवाड (चालक), विष्णू चव्हाण (चालक) आणि विक्रम पडगळ (सहायक) यांचा समावेश करण्यात आला आहे.
खजिनदारपदी सारंग दळवी (सहायक) तर संघटक सचिवपदी सचिन शिंदे (चालक) यांची निवड करण्यात आली. विभागीय प्रतिनिधी म्हणून संजय निकम (वाहतूक नियंत्रक) यांची, तर विशेष सल्लागारपदी बबनराव दुदुसकर आणि चंद्रकांत वळकुंदे यांची निवड करण्यात आली आहे. कार्यकारिणी सदस्य म्हणून अभिजीत दवंडे, लक्ष्मण खुडे, संदेश घाडगे, सचिन ससाणे, तानाजी गोंजारी आणि सोमनाथ क्षीरसागर यांची निवड करण्यात आली.
या वेळी नुतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच मेढा नगरपंचायतीच्या नगरसेवकपदी निवड झाल्याबद्दल शिवाजीराव देशमुख यांचा महाबळेश्वर आगार कामगार संघटनेच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. सर्व कामगारांना सोबत घेऊन संघटनेच्या बळकटीकरणासाठी आणि कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी संघटितपणे काम करण्याचा निर्धार नुतन पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
महाबळेश्वर आगाराच्या नुतन कार्यकारिणीचे कामगार संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष संदीप शिंदे, सरचिटणीस हणमंतराव ताटे यांच्यासह विविध स्तरांवरील पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.
Comments
Post a Comment