कोपरखैरणेत महाबळेश्वरच्या ग्रामस्थांची गर्दी; संजय मोरे–अजित संकपाळ यांना जाहीर पाठिंबा, ‘विकासाचा वारू’ कोयना–कांदाटी खोऱ्यात धावणारच!

कोपरखैरणेत महाबळेश्वरच्या ग्रामस्थांची गर्दी; संजय मोरे–अजित संकपाळ यांना जाहीर पाठिंबा, ‘विकासाचा वारू’ कोयना–कांदाटी खोऱ्यात धावणारच!

महाबळेश्वर प्रतिनिधी –

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रचाराचा वेग चांगलाच वाढला असताना शिवसेनेचे वाडा कुंभरोशी पंचायत समिती गणातील उमेदवार संजय मोरे आणि तळदेव जिल्हा परिषद गटातील उमेदवार अजित संकपाळ यांच्या प्रचारासाठी मुंबईतील कोपरखैरणे येथे महाबळेश्वर परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने एकवटले होते. या मेळाव्यात ग्रामस्थांनी शिवसेनेला जाहीर पाठिंबा देत, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. ना. एकनाथजी शिंदे साहेब यांचा विकासाचा वारू कोयना, सोशल कांदाटी खोऱ्यात दौडलाच पाहिजे, असा ठाम निर्धार व्यक्त केला.

मुंबईत वास्तव्यास असलेले महाबळेश्वर, कोयना व कांदाटी परिसरातील ग्रामस्थ गावाच्या विकासाशी आपली नाळ अजूनही घट्ट जोडलेली असल्याचे या मेळाव्यात दिसून आले. दळणवळण, पाणीपुरवठा, आरोग्य, रोजगार आणि पर्यटन विकास यांसारख्या प्रश्नांसाठी शिवसेनेचे नेतृत्वच प्रभावीपणे काम करू शकते, असा विश्वास व्यक्त करत ग्रामस्थांनी संजय मोरे आणि अजित संकपाळ यांच्या विजयाचा निर्धार केला. ‘एक निर्धार, एकच भगवा’ या घोषणांनी कोपरखैरणे परिसर दणाणून गेला होता.

यावेळी बोलताना उपस्थितांनी सांगितले की, कोयना व कांदाटी खोऱ्यातील भौगोलिक अडचणी लक्षात घेऊन रस्ते, पूल, पाणी योजना आणि पर्यटनाशी निगडित विकासकामे मार्गी लावण्यासाठी मा. ना. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने भरीव काम केले आहे. हीच विकासाची घडी पुढे नेण्यासाठी जिल्हा परिषद व पंचायत समिती स्तरावर शिवसेनेचे उमेदवार विजयी होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

निवडणुकीच्या तोंडावर मुंबईतील ग्रामस्थांचा हा उत्स्फूर्त प्रतिसाद प्रचाराला नवी ऊर्जा देणारा ठरला असून, संजय मोरे आणि अजित संकपाळ यांच्या प्रचारासाठी मुंबईकर ग्रामस्थ प्रत्यक्ष गावागावात जाऊन जोरदार प्रचार करताना दिसून येत आहेत. कोपरखैरणेतील या मेळाव्यामुळे महाबळेश्वर तालुक्यातील राजकीय वातावरण तापले असून, शिवसेनेच्या विजयाचा आत्मविश्वास अधिक बळावल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl