महाशिवरात्रीला महाबळेश्वरात 'इको-दोस्त' उपक्रमाचे यश; २४५ किलो कचरा वेगळा संकलित



महाशिवरात्रीला महाबळेश्वरात 'इको-दोस्त' उपक्रमाचे यश; २४५ किलो कचरा वेगळा संकलित

महाबळेश्वर प्रतिनिधी :

 महाशिवरात्री निमित्त श्री क्षेत्र महाबळेश्वर मंदिरात दर्शनासाठी उसळलेल्या भाविकांच्या गर्दीतून स्वच्छतेचा संदेश देण्यात नेस्ले इंडियाच्या हिलदारी अभियानाला यंदाही यश आले. गेल्या चार वर्षांपासून सातत्याने राबविल्या जाणाऱ्या 'इको-दोस्त' उपक्रमांतर्गत यावर्षी १२०० हून अधिक भाविक व पर्यटकांमध्ये कचरा व्यवस्थापनाची जाणीव करून देण्यात आली.

उपक्रमाअंती एकूण २०३.३७५ किलो ओला तर ४१.४७ किलो सुका कचरा वेगवेगळा संकलित करण्यात आला. मंदिर प्रशासनाकडून भाविकांना महाप्रसादाची सोय करण्यात आली असताना, कचरा व्यवस्थापनाकडे विशेष लक्ष देण्यात आले.

मंदिर परिसरात 'कचरा टाकू नका', 'ओला-सुका कचरा वेगवेगळा ठेवा' असे संदेश फलक लावून भाविकांमध्ये सतत जनजागृती करण्यात आली. यामुळे मंदिर परिसर दिवसभर स्वच्छ व नीटनेटका राहिला.

तहसीलदार सचिन मस्के, श्री क्षेत्र महाबळेश्वर देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी तसेच ग्रामपंचायत क्षेत्र महाबळेश्वर यांनी या उपक्रमात मोलाचे सहकार्य केले.

हिलदारीचे प्रकल्प व्यवस्थापक राम भोसले, प्रतिमा बोडरे, अनुराग खरे, खाकसर अली पटेल, स्वाती सकपाळ, अभिषेक खरे आणि स्वप्नाली काळे यांनी या उपक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले.

भाविकांमध्ये स्वच्छतेविषयी सकारात्मक जाणीव निर्माण झाली असून, भविष्यातही असे उपक्रम सातत्याने राबवण्याची गरज आहे, असे आयोजकांनी यावेळी सांगितले.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl