ब्रेकिंग : कुंभरोशी गणात राष्ट्रवादी आघाडीची पकड मजबूत, दुसऱ्या फेरीतही आघाडी कायम
ब्रेकिंग :
कुंभरोशी गणात राष्ट्रवादी आघाडीची पकड मजबूत, दुसऱ्या फेरीतही आघाडी कायम
महाबळेश्वर प्रतिनिधी
महाबळेश्वर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या मतमोजणीत कुंभरोशी गणातून राष्ट्रवादी आघाडीने पहिल्या फेरीत घेतलेली आघाडी दुसऱ्या फेरीतही कायम राखत आपली पकड अधिक मजबूत केली आहे. पहिल्या फेरीत मिळालेल्या आघाडीनंतर दुसऱ्या फेरीतही राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी मताधिक्य वाढवत प्रतिस्पर्ध्यांवर दबाव निर्माण केला आहे.
जिल्हा परिषद गटासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय गायकवाड यांनी दुसऱ्या फेरीत 641 मते मिळवत आघाडी कायम ठेवली असून शिवसेनेचे अजित संकपाळ यांना 587 मते मिळाली आहेत. भाजपचे सुभाष सोंडकर यांना 128 मते मिळाली आहेत. पहिल्या फेरीपासूनच संजय गायकवाड यांनी सातत्यपूर्ण आघाडी घेतल्याने कुंभरोशी गणात राष्ट्रवादी आघाडीची स्थिती अधिक भक्कम होत चालल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
पंचायत समिती गणातही राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिन उतेकर यांनी दुसऱ्या फेरीत 712 मते मिळवत आपली आघाडी अधिक वाढवली आहे. शिवसेनेचे संजय मोरे यांना 464 मते मिळाली असून अपक्ष उमेदवार समीर चव्हाण यांना 130 मते, भाजपचे सुरेश जाधव यांना 33 मते तर अपक्ष सनी मोरे यांना 17 मते मिळाली आहेत. पहिल्या फेरीतील आघाडीनंतर दुसऱ्या फेरीत मिळालेल्या मोठ्या मताधिक्यामुळे पंचायत समितीमध्येही राष्ट्रवादी आघाडी निर्णायक टप्प्याकडे वाटचाल करत असल्याचे दिसून येत आहे.
पहिली व दुसरी फेरी मिळून पाहता कुंभरोशी गणात राष्ट्रवादी आघाडीचे पारडे जड ठरत असून कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह संचारला आहे. मात्र अंतिम निकाल येईपर्यंत चुरस कायम राहणार असून पुढील फेऱ्यांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Comments
Post a Comment