बिग ब्रेकिंग : मेट गुताड गणात पहिल्या फेरीत पंचायत समितीत राष्ट्रवादी आघाडीवर, जिल्हा परिषदेत संजय केळगणे आघाडीवर
बिग ब्रेकिंग : मेट गुताड गणात पहिल्या फेरीत पंचायत समितीत राष्ट्रवादी आघाडीवर, जिल्हा परिषदेत संजय केळगणे आघाडीवर
महाबळेश्वर प्रतिनिधी
महाबळेश्वर तालुक्यातील मेट गुताड गणात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या मतमोजणीच्या पहिल्या फेरीचे निकाल जाहीर झाले असून या फेरीत दोन्ही ठिकाणी चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. पंचायत समितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शकुंतला चोरमले यांनी मोठी आघाडी घेतली असून जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीचे संजय केळगणे यांनी आघाडी मिळवली आहे.
पंचायत समिती गणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार शकुंतला चोरमले यांना पहिल्या फेरीत 1998 मते मिळाली असून त्या स्पष्ट आघाडीवर आहेत. भाजपच्या अमिना शारवान यांना 1150 मते मिळाली आहेत, तर शिवसेनेच्या वैशाली जाधव यांना 775 मते मिळाली आहेत. पहिल्याच फेरीत शकुंतला चोरमले यांनी जवळपास 800 मतांची आघाडी घेतल्याने राष्ट्रवादी समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र भाजपच्या अमिना शारवान यांची मतेही लक्षणीय असल्याने पुढील फेऱ्यांत लढत आणखी रंगतदार होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय केळगणे यांनी 2431 मते मिळवत पहिल्या फेरीत आघाडी घेतली आहे. भाजपच्या रंजना कदम यांना 1199 मते मिळाली असून शिवसेना शिंदे गटाचे प्रदीप चपटे यांना 327 मते मिळाली आहेत. या फेरीत संजय केळगणे यांनी जवळपास दुप्पट मतांची आघाडी घेतल्याने जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीचे पारडे जड दिसून येत आहे.
पहिल्या फेरीच्या निकालानंतर मेट गुताड गणात राजकीय वातावरण चांगलेच तापले असून राष्ट्रवादी व भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आणि चुरस दोन्ही पाहायला मिळत आहेत. मतमोजणीची प्रक्रिया अद्याप सुरू असून पुढील फेऱ्यांमध्ये आघाडी कायम राहते की उलटफेर होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Comments
Post a Comment