महाबळेश्वर तालुका निकाल जाहीर : भिलार गटात राष्ट्रवादी, तळदेव गटात शिवसेनेची बाजी; पंचायत समितीत समसमान तर जिल्हा परिषदेत एक-एक जागा

महाबळेश्वर तालुका निकाल जाहीर : भिलार गटात राष्ट्रवादी, तळदेव गटात शिवसेनेची बाजी; पंचायत समितीत समसमान तर जिल्हा परिषदेत एक-एक जागा

महाबळेश्वर प्रतिनिधी

महाबळेश्वर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा अंतिम निकाल जाहीर झाला असून तालुक्याचे राजकीय चित्र स्पष्ट झाले आहे. भिलार गटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली असून तळदेव गटामध्ये शिवसेनेने विजय मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. पंचायत समितीत दोन जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे तर दोन जागांवर शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले असून जिल्हा परिषदेत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना प्रत्येकी एक-एक जागा मिळाली आहे.

भिलार गण पंचायत समितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वंदना भिलारे यांनी 5136 मते मिळवत दणदणीत विजय मिळवला. भाजपच्या सुप्रिया भिलारे यांना 992 मते तर शिवसेनेच्या पुनम गोळे यांना 824 मते मिळाली. मोठ्या फरकाने मिळालेल्या या विजयामुळे भिलार गणात राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व ठळकपणे अधोरेखित झाले आहे.

मेट गुताड गण पंचायत समितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शकुंतला चोरमले यांनी 2784 मते मिळवत विजय मिळवला. शिवसेनेच्या वैशाली जाधव यांना 1655 मते तर भाजपच्या अमिना शारवान यांना 1698 मते मिळाली. चुरशीच्या लढतीत शकुंतला चोरमले यांनी निर्णायक आघाडी घेत राष्ट्रवादीचा झेंडा फडकावला.

जिल्हा परिषद भिलार गटात राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय केळगणे यांनी 8788 मते मिळवत विजय मिळवला. भाजपच्या रंजना कदम यांना 2695 मते तर शिवसेनेच्या प्रदीप चपटे यांना 1175 मते मिळाली. संजय केळगणे यांनी घेतलेली ही भक्कम आघाडी भिलार गटात राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजयाची स्पष्ट साक्ष देणारी ठरली.

दरम्यान, तळदेव गट जिल्हा परिषद आणि तळदेव व कुंभरोशी गण पंचायत समिती या ठिकाणी शिवसेनेने दणदणीत विजय मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. त्यामुळे महाबळेश्वर तालुक्यात पंचायत समितीत राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यात समसमान बळाचे संतुलन निर्माण झाले असून जिल्हा परिषदेतही दोन्ही पक्षांना प्रत्येकी एक जागा मिळाल्याने आगामी सत्तास्थापनेत राजकीय समीकरणे अत्यंत महत्त्वाची ठरणार आहेत.

अंतिम निकाल जाहीर होताच दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी आपापल्या पद्धतीने जल्लोष साजरा केला असून संपूर्ण तालुक्यात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl