बिग ब्रेकिंग : कुंभरोशी गणात तिसऱ्या फेरीअखेर चुरस वाढली, जिल्हा परिषदेत अजित संकपाळ आघाडीवर, पंचायत समितीतही जोरदार लढत
बिग ब्रेकिंग : कुंभरोशी गणात तिसऱ्या फेरीअखेर चुरस वाढली, जिल्हा परिषदेत अजित संकपाळ आघाडीवर, पंचायत समितीतही जोरदार लढत
महाबळेश्वर प्रतिनिधी
महाबळेश्वर तालुक्यातील कुंभरोशी गणातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या मतमोजणीच्या तिसऱ्या फेरीअखेर अधिकृत निकाल जाहीर झाला असून या फेरीत राजकीय चित्र अधिकच रंगतदार झाले आहे. पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये राष्ट्रवादी आघाडीवर असतानाच तिसऱ्या फेरीत शिवसेनेच्या उमेदवारांनी जोरदार मुसंडी मारल्याने जिल्हा परिषद आणि पंचायत समिती दोन्ही ठिकाणी चुरस कमालीची वाढली आहे.
जिल्हा परिषद गटासाठी तिसऱ्या फेरीत शिवसेनेचे उमेदवार अजित संकपाळ यांनी 806 मते मिळवत एकूण 2275 मतांपर्यंत मजल मारली असून ते आघाडीवर आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय गायकवाड यांना या फेरीत 402 मते मिळाली असून त्यांची एकूण मते 2127 झाली आहेत. भाजपचे सुभाष सोंडकर यांना या फेरीत 15 मते मिळाली असून त्यांची एकूण मते 427 झाली आहेत. या फेरीत अजित संकपाळ यांनी मोठे मताधिक्य घेतल्याने जिल्हा परिषद गटातील लढत अत्यंत अटीतटीची बनली असून अंतिम निकालाबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.
पंचायत समिती गणातही तिसऱ्या फेरीत शिवसेनेचे संजय मोरे यांनी जोरदार कामगिरी करत 913 मते मिळवली असून त्यांची एकूण मते 2038 वर पोहोचली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिन उतेकर यांना या फेरीत 270 मते मिळाली असून त्यांची एकूण मते 2281 झाली आहेत. भाजपचे सुरेश जाधव यांना 19 मते मिळून त्यांची एकूण मते 246 झाली आहेत. अपक्ष समीर चव्हाण यांना 17 मते मिळून एकूण 165, तर अपक्ष सनी मोरे यांना 2 मते मिळून एकूण 86 मते झाली आहेत. पंचायत समितीत राष्ट्रवादीचे सचिन उतेकर अद्याप आघाडीवर असले तरी शिवसेनेचे संजय मोरे यांनी घेतलेल्या मोठ्या झेपेमुळे येथील लढतही अधिक रंगतदार बनली आहे.
तिसऱ्या फेरीअखेर कुंभरोशी गणात दोन्ही प्रमुख पक्षांमध्ये थेट लढत दिसून येत असून प्रत्येक फेरीसोबत आघाडी बदलण्याची शक्यता असल्याने परिसरात कमालीची राजकीय उत्कंठा निर्माण झाली आहे. पुढील फेऱ्यांतील मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष लागले असून अंतिम निकाल काय लागणार याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
Comments
Post a Comment