महाबळेश्वरमध्ये उद्या मतमोजणी : १३ फेऱ्या, कडक बंदोबस्तात निकालाकडे लक्ष


महाबळेश्वरमध्ये उद्या मतमोजणी : १३ फेऱ्या, कडक बंदोबस्तात निकालाकडे लक्ष

मिलिंद काळे,

महाबळेश्वर प्रतिनिधी –

महाबळेश्वर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ अंतर्गत उद्या सोमवार, दिनांक ९ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता मतमोजणी प्रक्रिया गिरीस्थान प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय, महाबळेश्वर येथे सुरू होणार आहे. या मतमोजणी प्रक्रियेत तालुक्यातील दोन जिल्हा परिषद गट आणि चार पंचायत समिती गणांचा समावेश असून, एकूण १३ फेऱ्यांमध्ये मतमोजणी पूर्ण केली जाणार आहे.

मतमोजणीसाठी एकूण १२ टेबलांची व्यवस्था करण्यात आली असून, त्यामध्ये १० ईव्हीएम मतमोजणी टेबल व २ टपाली मतदानासाठी टेबलांचा समावेश आहे. या प्रक्रियेसाठी ४ रो अधिकारी, १० मतमोजणी पर्यवेक्षक आणि २० मतमोजणी सहाय्यक असे एकूण ३२ अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. तसेच मतमोजणीस अनुषंगिक कामकाजासाठी सुमारे ५० अतिरिक्त अधिकारी व कर्मचारी तैनात असणार आहेत. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मतमोजणी केंद्र परिसरात पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

मतमोजणी केंद्रामध्ये केवळ उमेदवार, त्यांचे अधिकृत निवडणूक प्रतिनिधी, मतमोजणी प्रतिनिधी आणि नियुक्त अधिकारी-कर्मचारी यांनाच प्रवेश दिला जाणार असून, मोबाईल फोन वापरास संपूर्णतः बंदी घालण्यात आली आहे. यामुळे मतमोजणी प्रक्रिया पारदर्शक, शांततापूर्ण आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडणार आहे.

वाहतूक व्यवस्थेच्या दृष्टीने मतमोजणी केंद्राकडे जाणाऱ्या चारचाकी व दुचाकी वाहनांसाठी महाबळेश्वर क्लब चौक, श्रेयस हॉटेल, केदार हॉटेल, आर.आर. हेरिटेज हॉटेल आणि हॉटेल उदय या मार्गांवरून ये-जा बंद करण्यात आली आहे. तसेच तीन ठराविक ठिकाणांपासूनच केवळ उमेदवार, मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी-कर्मचारी, प्रतिनिधी आणि पत्रकार यांनाच प्रवेश देण्यात येणार आहे.

दरम्यान, मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर महाबळेश्वर तालुक्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कोण बाजी मारणार, कोणाला यश मिळणार, याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली असून, उद्याच्या निकालातून तालुक्याच्या राजकीय दिशेला नवे वळण मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl