कुंभरोशी गणात सचिन उतेकरांसाठी जनसमुदाय एकवटला; ‘आमचा माणूस’ म्हणून नागरिकांचा ठाम विश्वास
कुंभरोशी गणात सचिन उतेकरांसाठी जनसमुदाय एकवटला; ‘आमचा माणूस’ म्हणून नागरिकांचा ठाम विश्वास
कुंभरोशी प्रतिनिधी –
महाबळेश्वर तालुक्यातील कुंभरोशी गणात राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार सचिन श्रीरंग उतेकर यांच्या प्रचाराला ग्रामीण भागातून मोठा प्रतिसाद मिळत असून सर्वसामान्य नागरिक स्वयंप्रेरणेने त्यांच्या पाठीशी उभे राहताना दिसत आहेत. गावागावातील नागरिकांनी प्रचाराची धुरा स्वतःहून हाती घेतल्याने कुंभरोशी गणात निवडणुकीचे चित्र स्पष्ट होत चालले आहे.
सचिन उतेकर हे कोणत्याही पदावर नसतानाही नागरिकांचे प्रश्न समजून घेऊन ते मार्गी लावण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहिले आहेत. पाणी, रस्ते, वीज, आरोग्य, शासकीय योजनांचे दाखले अशा रोजच्या अडचणींमध्ये ते थेट नागरिकांच्या संपर्कात राहिले. कामापुरते किंवा निवडणुकीपुरते गावात येणाऱ्या उमेदवारांपेक्षा सचिन उतेकर हे कायम आमच्यातलेच असल्याची भावना ग्रामीण भागात ठळकपणे व्यक्त होत आहे.
प्रचारादरम्यान अनेक गावांत नागरिक स्वतः पुढाकार घेऊन सभा, भेटीगाठी आणि घराघरांत संवाद साधत आहेत. युवकांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्व स्तरातील लोकांचा सहभाग वाढत असून ‘आमचा माणूस, आमचा प्रतिनिधी’ असा विश्वास नागरिक उघडपणे व्यक्त करत आहेत. विकासाची स्पष्ट भूमिका, सातत्यपूर्ण संपर्क आणि समस्यांवर तात्काळ उपाययोजना ही सचिन उतेकरांची ओळख असल्याचे ग्रामस्थ सांगतात.
या वाढत्या जनसमर्थनामुळे कुंभरोशी गणात राष्ट्रवादी काँग्रेसला बळकटी मिळाली असून नागरिकांनी एकत्र येत सचिन उतेकरांचा विजय निश्चित करण्याचा चंग बांधल्याचे चित्र सध्या संपूर्ण गणात पाहायला मिळत आहे.
Comments
Post a Comment