महाबळेश्वरमध्ये संत रोहिदास महाराज जयंती उत्साहात साजरी

महाबळेश्वरमध्ये संत रोहिदास महाराज जयंती उत्साहात साजरी

महाबळेश्वर प्रतिनिधी –

महाबळेश्वर येथे संत शिरोमणी रोहिदास महाराज जयंती मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने साजरी करण्यात आली. यावेळी संत रोहिदास महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. समाजातील सर्व स्तरातील नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावून संतांच्या विचारांना अभिवादन केले.

कार्यक्रमात विजय नायडू यांनी मनोगत व्यक्त करताना संत रोहिदास महाराजांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. समता, मानवता, श्रमप्रतिष्ठा आणि आत्मसन्मानाचा संदेश देणारे संत रोहिदास महाराज आजच्या काळातही मार्गदर्शक असल्याचे त्यांनी सांगितले. समाजातील विषमता दूर करून सर्वांना समानतेच्या आधारावर जगण्याची प्रेरणा संत रोहिदास महाराजांनी दिली, असे मत त्यांनी व्यक्त केले.

यानंतर राजेश कुंभारदरे यांनी मनोगतातून संत रोहिदास महाराजांच्या विचारांची उपयुक्तता मांडली. संत रोहिदास महाराज हे केवळ एका समाजाचे नव्हे तर संपूर्ण मानवजातीचे संत असून त्यांचे विचार समाज एकसंध ठेवण्यासाठी आजही तितकेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमाला मधुकर साळुंखे, आप्पासाहेब साळुंखे, नितीन बापू साळुंखे, अनिल साळुंखे, सागर सोनवणे, संजय साळुंखे, जयवंत साळुंखे, प्रशांत साळुंखे, उमेश साळुंखे, पंकज कदम, भरत वर्पे, राजाभाऊ गुजर यांच्यासह अनेक मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी संत रोहिदास महाराजांच्या विचारांवर चालण्याचा संकल्प करत जयंती उत्साहात साजरी केली.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl