वसई–विरारमध्ये राष्ट्रवादीचा जोरदार मेळावा; बाळासाहेब भिलारे यांच्या मानसपुत्राच्या विजयासाठी कार्यकर्ते सरसावले
वसई–विरारमध्ये राष्ट्रवादीचा जोरदार मेळावा; बाळासाहेब भिलारे यांच्या मानसपुत्राच्या विजयासाठी कार्यकर्ते सरसावले
विरार प्रतिनिधी:
येत्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वसई–विरार येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा भव्य मेळावा उत्साहात पार पडला. या मेळाव्यात बाळासाहेब भिलारे यांचे मानसपुत्र असलेल्या उमेदवाराच्या विजयासाठी वसई–विरार परिसरातील कार्यकर्त्यांनी एकजूट दाखवत जोमाने सहभाग नोंदवला. परिसरातील विविध गावांतील कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित असल्याने मेळाव्याला चांगली गर्दी आणि सकारात्मक वातावरण लाभले.
या मेळाव्याचे नियोजन संजूबाबा गायकवाड यांचे खास शिलेदार व सोनाट गावचे उद्योजक श्री शांताराम कदम यांनी केले होते. त्यांच्या या नियोजनाला घावरी गावचे श्री किसन जाधव, खरोशी गावचे श्री समीर कदम व श्री संपत कदम, देवळी गावचे श्री आनंद जाधव व श्री भगवान जाधव यांनी मोलाची साथ दिली. सर्व कार्यकर्त्यांच्या समन्वयातून हा मेळावा यशस्वीरीत्या पार पडला.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून येरणे येथील उद्योजक श्री अंकुश मोरे, आमशी येथील युवा उद्योजक श्री भाऊ मोरे, श्री अरुण संभाजी जंगम, श्री पारुनाथ जंगम, तळदेवचे माजी पोलीस पाटील श्री शंकर जंगम, वेळापूरचे श्री आनंद संकपाळ व श्री नितिन संकपाळ, देवसरेचे श्री तानाजी जाधव तसेच देवळीचे श्री प्रदीप पवार आदी मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाची शोभा अधिक वाढली.
या वेळी स्वामी अरुण जंगम यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना विकासाभिमुख विचार मांडले. ज्या उमेदवाराने दहा वर्षे सभापती पदाचा अनुभव घेतला आहे, ज्याला विकासाचा १०५ चा आराखडा माहिती आहे, अशाच अनुभवी उमेदवाराला निवडून द्या आणि परिसराचा सर्वांगीण विकास साधा, पैशाच्या मोहाला बळी पडू नका, असे आवाहन त्यांनी केले. त्यांच्या स्पष्ट आणि अभ्यासपूर्ण मार्गदर्शनाला कार्यकर्त्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला.
यावेळी संजूबाबा गायकवाड यांनी कार्यकर्त्यांचे कौतुक करत, त्यांच्या मेहनतीमुळेच हा कार्यक्रम यशस्वी झाल्याचे सांगून सर्वांचे आभार मानले. पंचायत समितीच्या निवडणुकीत जसा भरभरून पाठिंबा दिला, तसाच पाठिंबा आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या उमेदवारांनाही द्यावा, अशी जोरदार हाक त्यांनी उपस्थितांना दिली.
कार्यक्रमाचा समारोप सोनाट गावचे उद्योजक श्री विठ्ठल कदम यांनी केला. त्यांनी उपस्थित सर्व मान्यवर, कार्यकर्ते आणि समर्थकांचे आभार मानत कार्यक्रमाची सांगता केली. या मेळाव्यामुळे वसई–विरार परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संघटन अधिक मजबूत झाल्याचे चित्र दिसून आले असून आगामी निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांमध्ये नवी ऊर्जा संचारली आहे.
Comments
Post a Comment