भिलार गणात कौशल्या भिलारे यांना जनतेचा वाढता पाठिंबा; समाजकार्याची भक्कम पार्श्वभूमी ठरतेय ताकद
भिलार गणात कौशल्या भिलारे यांना जनतेचा वाढता पाठिंबा; समाजकार्याची भक्कम पार्श्वभूमी ठरतेय ताकद
भिलार प्रतिनिधी –
पंचायत समिती भिलार गणाच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार कौशल्या भिलारे यांना सर्वसामान्य जनतेकडून वाढता पाठिंबा मिळताना दिसत आहे. कौशल्य भिलारे या ज्येष्ठ समाजसेवक संभाजी भिलारे गुरुजी यांच्या पत्नी असून त्यांच्या समाजकार्याची दीर्घ परंपरा भिलार गणात परिचित आहे. शिक्षण, सामाजिक उपक्रम आणि विकासकामांबाबत सातत्याने केलेल्या प्रयत्नांमुळे भिलारे कुटुंबाबद्दल जनतेमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे.
संभाजी भिलारे गुरुजी यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाची संधी मिळावी यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. विद्यार्थ्यांना संगणकाचे ज्ञान मिळावे यासाठी दरवर्षी उपक्रम राबवले जात असून सुमारे २५ विद्यार्थी दरवर्षी संगणक शिक्षण घेऊन यशस्वी होत आहेत. या उपक्रमांमुळे अनेक कुटुंबांना शिक्षणाच्या माध्यमातून नवी दिशा मिळाल्याचे नागरिक सांगतात.
विकासकामांच्या दृष्टीनेही भिलारे गुरुजी यांनी नेहमीच पुढाकार घेतला असून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून विविध विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आहे. रस्ते, पाणीपुरवठा, शिक्षण व मूलभूत सुविधा या विषयांना प्राधान्य देत त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे.
याच समाजकार्याच्या विचारातून कौशल्या भिलारे यांनी अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात प्रवेश केला असून त्यांची उमेदवारी ही कोणत्याही राजकीय स्वार्थापेक्षा जनहिताला प्राधान्य देणारी असल्याचे मत मतदारांमध्ये व्यक्त होत आहे. साधी जीवनशैली, थेट संपर्क आणि कामाचा अनुभव यामुळे त्यांना भिलार गणात सर्वसामान्य नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
एकूणच समाजकार्याची भक्कम पार्श्वभूमी, विकासाचा ठोस दृष्टिकोन आणि जनतेशी असलेला थेट संवाद यामुळे पंचायत समिती भिलार गणात अपक्ष उमेदवार कौशल्या भिलारे यांची उमेदवारी लक्षवेधी ठरत असून त्यांना मिळणारा वाढता जनसमर्थन चर्चेचा विषय ठरत आहे.
Comments
Post a Comment