मरणानंतरही दुसऱ्यांना जीवनाचा प्रकाश; कै. रामचंद्र नारायण बावळेकर यांचे मरणोत्तर नेत्रदानातून समाजाला प्रेरणादायी आदर्श
मरणानंतरही दुसऱ्यांना जीवनाचा प्रकाश; कै. रामचंद्र नारायण बावळेकर यांचे मरणोत्तर नेत्रदानातून समाजाला प्रेरणादायी आदर्श
महाबळेश्वर प्रतिनिधी :
जगद्गुरु रामानंदचार्य नरेंद्रचार्यजी महाराज यांच्या प्रेरणेतून राबविण्यात येणाऱ्या मरणोत्तर अवयवदान या समाजोपयोगी उपक्रमांतर्गत महाबळेश्वर तालुक्यातील मेट गुताड येथील कै. रामचंद्र नारायण बावळेकर यांचे मरणोत्तर नेत्रदान करण्यात आले. दिनांक ३० डिसेंबर रोजी वृद्धापकाळाने वयाच्या ९४ व्या वर्षी त्यांचे निधन झाले. निधनानंतरही “तुम्ही जगा, दुसऱ्याला जगवा” या जगद्गुरु रामानंदचार्य नरेंद्रचार्यजी महाराज यांच्या प्रेरणादायी संदेशाला अनुसरून बावळेकर कुटुंबीयांनी समाजापुढे एक आदर्श निर्माण केला.
कै. रामचंद्र नारायण बावळेकर यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी आणि नातेवाईकांनी एकमताने निर्णय घेत क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालय, सातारा येथे मरणोत्तर नेत्रदान केले. या निर्णयामुळे दृष्टिहीन व्यक्तींना पुन्हा एकदा जीवनाचा प्रकाश मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. जगद्गुरु रामानंदचार्य नरेंद्रचार्यजी महाराज यांच्या माध्यमातून आजपर्यंत समाजात विविध सामाजिक व जनहितकारी उपक्रम राबविण्यात आले असून मरणोत्तर देहदान, नेत्रदान व अवयवदानासारख्या उपक्रमांद्वारे मृत्यूनंतरही दातृत्वाची शिकवण दिली जात आहे. आजपर्यंत सुमारे १६८ देहदान व १०२ हून अधिक अवयवदानाचे उपक्रम यशस्वीपणे राबविले गेले असून त्याच प्रेरणेतून बावळेकर कुटुंबीयांनी हा निर्णय घेतला.
या नेत्रदान प्रसंगी कै. रामचंद्र नारायण बावळेकर यांचे चिरंजीव मंगलदास रामचंद्र बावळेकर, शकुंतला मंगलदास बावळेकर, पुतण्या दिलीप बाबुराव बावळेकर, अंकुश बाबुराव बावळेकर, नातू कल्पेश मंगलदास बावळेकर व सौ. प्राजक्ता कल्पेश बावळेकर, नातू राकेश मंगलदास बावळेकर व सौ. मेघा राकेश बावळेकर, मुलगी सौ. शशिकला शांताराम मानकुंबरे, सौ. सुमन शंकर भिलारे, नात सौ. सुजाता शैलेश उतेकर यांच्यासह कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.
यावेळी सांप्रदायातर्फे महाबळेश्वर तालुका अध्यक्ष संजय दगडू नवघणे, तालुका सामाजिक उपक्रम प्रमुख दिलीप नारायण लांगी, तालुका युवा प्रमुख सुरेश कात्रट, तालुका ब्रिगेडियर विकास दिनेश बावळेकर, वारकरी सांप्रदाय दिंडी संघटना सचिव चंद्रकांत दगडू बावळेकर, माजी नगराध्यक्ष डी. एम. बावळेकर, सरपंच महादेव मारुती ओंबळे यांच्यासह महाबळेश्वर तालुका सेवा समिती व मेट गुताड सेवा केंद्र समितीचे पदाधिकारी व भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“मरावे परी कीर्ती रूपी उरावे” या उक्तीप्रमाणे कै. रामचंद्र नारायण बावळेकर यांनी मरणानंतरही आपल्या नेत्रदानातून समाजात मानवतेचा दीप उजळविला असून बावळेकर कुटुंबीयांनी दिलेला हा आदर्श अनेकांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.
Comments
Post a Comment