महाबळेश्वरच्या घोणसपूर जंगलात मधु मकरंद किल्ला ट्रेक व कॅम्पिंगला ट्रेकर्सचा वाढता प्रतिसाद

महाबळेश्वरच्या घोणसपूर जंगलात मधु मकरंद किल्ला ट्रेक व कॅम्पिंगला ट्रेकर्सचा वाढता प्रतिसाद

महाबळेश्वर प्रतिनिधी –

महाबळेश्वर तालुक्यातील घोणसपूर जंगल परिसरात असलेला ऐतिहासिक मधु मकरंद किल्ला सध्या ट्रेकिंग आणि कॅम्पिंग प्रेमींना खुणावत असून प्रत्येक शनिवार व रविवार येथे जंगल ट्रेक व कॅम्पिंग उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या या किल्ल्यावर निसर्गसौंदर्य, घनदाट जंगल, शांत वातावरण आणि रोमांचक ट्रेकिंगचा अनुभव एकाच ठिकाणी मिळत असल्याने राज्याच्या विविध भागातून ट्रेकर्स मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत.

मधु मकरंद किल्ला जंगल ट्रेक हा ‘विदाऊट ट्रान्सपोर्ट’ स्वरूपात आयोजित करण्यात येत असून प्रति व्यक्ती खर्च १५०० रुपये इतका ठेवण्यात आला आहे. या खर्चामध्ये पहिल्या दिवशी संध्याकाळचा चहा, तीन ते चार जणांसाठी टेन्टची सोय, बोन फायर, तसेच व्हेज अनलिमिटेड रात्रीचे जेवण देण्यात येते. कॅम्पिंग दरम्यान निसर्गाच्या सान्निध्यात मुक्काम करण्याचा अनोखा अनुभव ट्रेकर्सना मिळतो.

दुसऱ्या दिवशी सकाळचा चहा, नाश्ता, वन विभागाची अधिकृत परवानगी, अनुभवी गाईडची साथ तसेच सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाची परवानगी यांचा समावेश आहे. याशिवाय दुपारचे जेवण पार्सल स्वरूपात आणि संध्याकाळचा चहा देऊन ट्रेकची सांगता करण्यात येते. संपूर्ण ट्रेक सुरक्षित आणि नियोजित पद्धतीने पार पडावा यासाठी आयोजकांकडून आवश्यक ती काळजी घेतली जात आहे.

हा उपक्रम खास मधु मकरंद किल्ला जंगल ट्रेकसाठी इच्छुक असलेल्या ट्रेकर्ससाठीच असून, येणार असलेल्यांनीच व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सहभागी व्हावे, असे आयोजकांनी स्पष्ट केले आहे. ट्रेक व कॅम्पिंगसाठी येताना किमान एक दिवस आधी बुकिंग करणे आवश्यक असून पूर्ण किंवा किमान ७० टक्के रक्कम भरल्यानंतरच बुकिंग ग्राह्य धरले जाणार आहे.

महाबळेश्वर परिसरात साहसी पर्यटनाला चालना देणारा हा उपक्रम तरुणाईसह निसर्गप्रेमींमध्ये लोकप्रिय ठरत असून, मधु मकरंद किल्ल्याच्या जंगल ट्रेकमुळे या भागातील पर्यटनाला नवी दिशा मिळत असल्याचे चित्र दिसत आहे. अधिक माहितीसाठी इच्छुकांनी ९२६०००४३६६ किंवा ८०८७०६७१०७ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl