बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त महाबळेश्वरमध्ये अभिवादन; शिवसैनिकांची मोठी उपस्थिती
बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त महाबळेश्वरमध्ये अभिवादन; शिवसैनिकांची मोठी उपस्थिती
महाबळेश्वर प्रतिनिधी :
हिंदूहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त महाबळेश्वर येथील हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे चौक, पंचायत समिती परिसरात त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन शिवसेनेच्या वतीने करण्यात आले असून, सातारा जिल्हा प्रमुख यशवंत घाडगे, माजी जिल्हाप्रमुख राजेश बंडू दादा कुंभारदरे आणि माजी शहरप्रमुख सुनील नाना साळुंखे यांच्या हस्ते बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी बाळासाहेब ठाकरे यांचे विचार, हिंदुत्व, मराठी माणसाचा स्वाभिमान आणि सामाजिक न्यायासाठी केलेले कार्य यांचा उपस्थितांनी गौरव केला. शिवसेना ही केवळ राजकीय संघटना नसून ती एक विचारधारा आहे, आणि ती बाळासाहेबांच्या विचारांवरच पुढे चालत राहील, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
या अभिवादन कार्यक्रमास उपजिल्हाप्रमुख विश्वनाथ दादा धनावडे, शिवसेना सातारा जिल्हा राजश्री ताई भिसे, तालुका प्रमुख अभिषेक शिंदे, शहरप्रमुख राजाभाऊ गुजर, उपशहरप्रमुख राजेश साळवी, बाळकृष्ण साळुंखे, सीडी बावळेकर, मनोज ताथडेकर, सचिन धोत्रे, रमेश शिंदे, नितीन परदेशी, ऋषिकेश वायदंडे, अशोक मामा शिंदे, संतोष साळुंखे, शंकर ढेबे, प्रशांत मोरे, यशवंत आप्पा भिलारे, अरुण बावळेकर, दत्ताभाऊ बावळेकर, शहानवाज भाई खरखंडे, अली भाई वारूणकर, असिफ भाई महापुळे, शहर संघटिका शिल्पाताई ठक्कर, वसुधा बगाडे, अनिल भाऊ पारठे, काशीराम शिंदे, अमोल साळुंखे, शुभम कुंभारदरे, संजय पाटील, जयवंत वाईकर, अंकुश ऊलालकर, मोहन कारंडे, जितेश कुंभारदरे, महेश लांगी यांच्यासह ज्येष्ठ पत्रकार विलास बापू काळे, अभिजीत खुरासने, सचिन शिर्के, राजेश सोंडकर आदी शिवसैनिक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांच्या विचारांप्रती निष्ठा व्यक्त करत, समाजहितासाठी काम करण्याचा संकल्प यावेळी केला. कार्यक्रम शांततेत आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
Comments
Post a Comment