सहकार भारती व ग्रामपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने श्रीक्षेत्र महाबळेश्वर येथे यशस्वी नेत्र तपासणी शिबिर; १२५ नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग
सहकार भारती व ग्रामपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने श्रीक्षेत्र महाबळेश्वर येथे यशस्वी नेत्र तपासणी शिबिर; १२५ नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग
महाबळेश्वर प्रतिनिधी :
सहकार भारतीच्या वर्धापन दिनानिमित्त श्रीक्षेत्र महाबळेश्वर येथे ग्रामपंचायत आणि सहकार भारती यांच्या संयुक्त विद्यमाने नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. जिल्हा परिषद शाळा, क्षेत्र महाबळेश्वर येथे सकाळी ९.३० ते दुपारी १.०० वाजेपर्यंत हे शिबिर पार पडले. या शिबिराला गावातील विविध शाळांतील विद्यार्थी, पालक तसेच ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.
या शिबिरात एकूण १२५ नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात आली. लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनी या आरोग्य उपक्रमाचा लाभ घेतला. ग्रामीण भागात डोळ्यांच्या आजारांविषयी जनजागृती व्हावी आणि वेळेवर तपासणी होऊन योग्य उपचार मिळावेत, या उद्देशाने हे शिबिर आयोजित करण्यात आले होते.
कार्यक्रमास सहकार भारतीचे जिल्हा सदस्य दीपक बावळेकर, ग्रामपंचायतीचे सरपंच सुनील बिरामणे, ग्रामपंचायत सदस्य सारिका पुजारी, धनेश वाडेकर, गणेश धनावडे, प्रदीप कात्रट, निलेश धनावडे उपस्थित होते. तसेच सहकार भारती महाबळेश्वरचे सदस्य ओंकार दीक्षित, सतीश ओंबळे, राहुल कदम, दत्तात्रय कांबळे, नितीन लांगी, सतीशजी ओंबळे, शाळेच्या मुख्याध्यापिका ज्योती कदम, शिक्षक अविनाश हजारे, रवी सर, मयुरी कांबळे यांच्यासह क्षेत्र महाबळेश्वरमधील सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाला ग्रामपंचायत अधिकारी श्री. प्रशांत रणपिसे यांची विशेष उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक अविनाश हजारे सर यांनी केले. यावेळी सरपंच सुनील बिरामणे आणि सहकार भारतीचे जिल्हा सदस्य दीपक बावळेकर यांनी आपल्या मनोगतातून आरोग्य तपासणीचे महत्त्व विशद करत अशा उपक्रमांची सातत्याने गरज असल्याचे मत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या शेवटी सहकार भारतीचे जिल्हा सदस्य प्रशांत कात्रट यांनी उपस्थितांचे आभार मानले.
सहकार भारती व ग्रामपंचायतीच्या या संयुक्त सामाजिक उपक्रमामुळे ग्रामस्थांमध्ये आरोग्याबाबत सकारात्मक जागरूकता निर्माण झाली असून, भविष्यातही असे उपक्रम राबवावेत, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
Comments
Post a Comment