क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त महाबळेश्वर नगरपरिषदेत अभिवादन
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त महाबळेश्वर नगरपरिषदेत अभिवादन
महाबळेश्वर प्रतिनिधी –
महिला शिक्षणाच्या प्रणेत्या, विद्रोहाची जननी आणि समाजसुधारणेची तेजस्वी मशाल असलेल्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९५ व्या जयंतीनिमित्त महाबळेश्वर गिरीस्थान नगरपरिषदेच्या वतीने त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी महाबळेश्वर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष सुनील शिंदे यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.
या अभिवादन कार्यक्रमास माजी उपनगराध्यक्ष नगरसेवक अफजलभाई सुतार, ज्येष्ठ नगरसेविका विमलताई पारठे, नगरसेवक संतोष (आबा) शिंदे, अँड. संजय जंगम, रोहित ढेबे, राहुल पिसाळ, नगरसेविका विद्या बावळेकर, पल्लवी कोंढाळकर , निता झाडे, दत्तात्रय वाडकर, अक्षय वायदंडे, आकाश झाडे, संतोष पवार, मुख्य लिपिक आबाजी ढोबळे, सचिन दीक्षित, किरण ढेबे, नासीर वलगे यांच्यासह नगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणासाठी केलेले ऐतिहासिक कार्य, सामाजिक अन्यायाविरोधातील त्यांचा संघर्ष आणि आजच्या समाजासाठी त्यांचे विचार किती प्रेरणादायी आहेत, यावर उपस्थितांनी मनोगत व्यक्त केले. स्त्री-पुरुष समानतेचा संदेश देत शिक्षण हे परिवर्तनाचे प्रभावी साधन असल्याचे सावित्रीबाई फुले यांनी समाजाला दाखवून दिले, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महाबळेश्वर नगरपालिकेचे नगराध्यक्ष, नगरसेवक, अधिकारी व कर्मचारी यांच्या वतीने त्यांच्या विचारांना अभिवादन करण्यात आले असून, त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शिक्षण आणि समानतेचा संदेश पोहोचवण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.
Comments
Post a Comment