कुंभरोशी पंचक्रोशीसाठी शिवसेनेकडून रुग्णवाहिकेची मोठी भेट; ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

कुंभरोशी पंचक्रोशीसाठी शिवसेनेकडून रुग्णवाहिकेची मोठी भेट; ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

कुंभरोशी प्रतिनिधी :

कुंभरोशी गावासह पंचक्रोशीतील नागरिकांच्या आरोग्य सेवांना बळकटी देण्यासाठी शिवसेनेच्या वतीने अत्याधुनिक रुग्णवाहिकेची महत्वपूर्ण भेट देण्यात आली आहे. शिवसेनेचे नेते अजित सपकाळ यांच्या पुढाकारातून ही रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आल्याने ग्रामीण भागातील आपत्कालीन वैद्यकीय सेवेचा मोठा प्रश्न मार्गी लागला असून ग्रामस्थांमध्ये समाधान आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.

ग्रामीण भागात अपघात, अचानक आजारपण किंवा गंभीर प्रसंगी रुग्णांना वेळेत रुग्णालयात पोहोचवणे हे नेहमीच आव्हानात्मक ठरत होते. रुग्णवाहिकेअभावी अनेकदा खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत होता, त्यामुळे वेळ आणि आर्थिक अडचणी निर्माण होत होत्या. ही बाब लक्षात घेऊन कुंभरोशी व परिसरातील नागरिकांसाठी कायमस्वरूपी रुग्णवाहिका उपलब्ध व्हावी, यासाठी स्थानिक युवक सनी मोरे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. युवकांनी लोकप्रतिनिधींकडे वारंवार मागणी लावून धरत आरोग्य सुविधांच्या गरजेवर भर दिला होता.

या प्रयत्नांना यश येत अखेर कुंभरोशी गावासाठी रुग्णवाहिका उपलब्ध झाली. रुग्णवाहिकेच्या आगमनानंतर ग्रामस्थांनी आणि युवकांनी आनंदोत्सवाच्या वातावरणात अजित सपकाळ यांचे स्वागत करत त्यांचे आभार मानले. या रुग्णवाहिकेमुळे अपघातग्रस्त रुग्ण, गंभीर आजाराने त्रस्त नागरिक तसेच गर्भवती महिलांना तातडीच्या प्रसंगी सुरक्षित आणि वेळेत रुग्णालयात नेणे आता अधिक सुलभ होणार आहे.

ही सेवा केवळ कुंभरोशी गावापुरती मर्यादित न राहता आजूबाजूच्या संपूर्ण पंचक्रोशीतील नागरिकांसाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. आरोग्याच्या दृष्टीने ही रुग्णवाहिका ग्रामीण भागासाठी जीवनदायी ठरणार असून आपत्कालीन प्रसंगी अमूल्य वेळ वाचण्यास मदत होणार आहे.

या लोकहिताच्या उपक्रमाबद्दल ग्रामस्थ, युवक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी शिवसेनेचे नेते अजित सपकाळ, सनी मोरे तसेच त्यांच्या सहकाऱ्यांचे विशेष आभार मानले. भविष्यातही अशा प्रकारच्या मूलभूत सुविधा ग्रामीण भागात उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेतला जावा, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl