कुंभरोशी पंचक्रोशी साठी शिवसेनेकडून रुग्णवाहिकेची मोठी भेट; ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद


कुंभरोशी पंचक्रोशी साठी शिवसेनेकडून रुग्णवाहिकेची मोठी भेट; ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

कुंभरोशी प्रतिनिधी : 

कुंभरोशी गावासह परिसरातील ग्रामस्थांच्या आरोग्य सुविधांसाठी शिवसेनेचे नेते अजित सपकाळ यांच्या पुढाकारातून अत्याधुनिक रुग्णवाहिका देण्यात आली. ग्रामीण भागात आपत्कालीन वैद्यकीय सेवांचा मोठा प्रश्न लक्षात घेऊन ही रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आल्याने ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. रुग्णवाहिकेच्या आगमनानंतर ग्रामस्थ व युवकांनी आनंदोत्सवाच्या वातावरणात अजित सपकाळ यांचे आभार मानत स्वागत केले.

या रुग्णवाहिकेसाठी स्थानिक युवक सनी मोरे यांच्यासह सहकाऱ्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. आरोग्याच्या गंभीर प्रसंगी रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत, यासाठी युवकांनी लोकप्रतिनिधींकडे वारंवार मागणी लावून धरली होती. अखेर या प्रयत्नांना यश येत कुंभरोशी गावासाठी रुग्णवाहिका उपलब्ध झाली. या सेवेमुळे गावासह आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

ग्रामीण भागात रुग्णवाहिकेअभावी अनेकदा रुग्णांना वेळेत रुग्णालयात पोहोचवणे कठीण जात होते. आता ही रुग्णवाहिका कार्यान्वित झाल्याने अपघात, आजारपण तसेच गर्भवती महिलांना तातडीच्या प्रसंगी सुरक्षितरीत्या रुग्णालयात नेणे सुलभ होणार आहे. ग्रामस्थांनी ही सुविधा केवळ कुंभरोशीपुरती न राहता संपूर्ण परिसरासाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.

या उपक्रमाबद्दल ग्रामस्थ, युवक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी शिवसेनेचे नेते अजित सपकाळ तसेच सनी मोरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे विशेष आभार मानले. भविष्यातही अशा लोकहिताच्या कामांमुळे ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास साधला जाईल, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl