लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचा गौरव; महाबळेश्वर नगरपरिषदेचा पत्रकार सन्मान सोहळा उत्साहात

लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचा गौरव; महाबळेश्वर नगरपरिषदेचा पत्रकार सन्मान सोहळा उत्साहात

✍️ संदीप देवकुळे,

महाबळेश्वर प्रतिनिधी – 

आचार्य बाळशास्त्री जांभेकर जयंती आणि पत्रकार दिनानिमित्त महाबळेश्वर गिरिस्थान नगरपरिषदेच्या वतीने आयोजित पत्रकार सन्मान सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. पत्रकारितेच्या क्षेत्रात दीर्घकाळ उल्लेखनीय, निर्भीड व समाजहिताचे कार्य करणाऱ्या पत्रकारांचा यावेळी सन्मान करून त्यांच्या सामाजिक योगदानाचा गौरव करण्यात आला.

या कार्यक्रमास नगराध्यक्ष सुनील शिंदे, मुख्याधिकारी योगेश पाटील, नगरसेविका विमलताई पार्टे व स्मिता पाटील, नगरसेवक संतोष आखाडे व रोहित ढेबे यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते पत्रकार बांधवांचा पुष्पगुच्छ, शाल व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.

कार्यक्रमात बोलताना नगराध्यक्ष सुनील शिंदे यांनी पत्रकार हा समाजाचा आरसा असून लोकशाही मजबूत करण्यामध्ये पत्रकारितेची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगितले. स्थानिक प्रश्नांना वाचा फोडून प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना योग्य दिशा देण्याचे काम पत्रकार जबाबदारीने करत असल्याचे त्यांनी नमूद केले. मुख्याधिकारी योगेश पाटील यांनीही प्रामाणिक, वस्तुनिष्ठ आणि सकारात्मक पत्रकारितेमुळे प्रशासनास निर्णय प्रक्रियेत योग्य मार्गदर्शन मिळते, असे सांगत सर्व पत्रकारांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी उपस्थित नगरसेविका व नगरसेवकांनी पत्रकारांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. मात्र, काही नगरसेवकांनी कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्याने उपस्थित पत्रकारांमध्ये नाराजीची भावना व्यक्त झाली.

सत्कार स्वीकारताना ज्येष्ठ पत्रकारांनी मनोगत व्यक्त करताना सामाजिक बांधिलकी जपत निर्भीड आणि वस्तुनिष्ठ पत्रकारितेचा ध्यास कायम ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला. नागरिकांच्या समस्यांना न्याय मिळवून देणे, सत्य मांडणे आणि विकासकामांवर योग्य प्रकाश टाकणे हीच खरी पत्रकार दिनाची परंपरा असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे संयोजन नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आले. सूत्रसंचालन संतोष दड यांनी केले तर आभार प्रदर्शन विलास काळे यांनी मानले. प्रास्ताविकात पत्रकार दिनाचे ऐतिहासिक महत्त्व आणि आधुनिक मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या अग्रणी कार्याचा गौरवपूर्वक उल्लेख करण्यात आला.

या कार्यक्रमास शहरातील ज्येष्ठ पत्रकार संजय दस्तुरे, विलास काळे, रमेश पलोड, पत्रकार संघाचे अध्यक्ष अजित जाधव, सचिन शिर्के, राजेश सोंडकर, शरद झावरे, सादिक सय्यद, जितेंद्र कारंडे, शानपरवेझ डांगे, मिलिंद काळे, संदेश भिसे, अजित कुंभारदरे, राहुल शेलार, रियाज मुजावर यांच्यासह पालिकेचे कर निरीक्षक अमित माने व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl