विकासाच्या मुद्द्यावर शिवसेनेची विजय सभा गाजली; १०५ गावांच्या प्रगतीसाठी एकजुटीचा निर्धार
विकासाच्या मुद्द्यावर शिवसेनेची विजय सभा गाजली; १०५ गावांच्या प्रगतीसाठी एकजुटीचा निर्धार
कुंभरोशी प्रतिनिधी
तालुक्यातील विजय सभेत शिवसेनेच्या विकासकामांचा आणि भावी वाटचालीचा ठाम संदेश देण्यात आला. सभेला उपस्थित असलेले उपमुख्यमंत्री तथा शिवसेना नेते, विभागाचे सुपुत्र आणि लालबाग परळचे माजी आमदार दगडू दादा संकपाळ, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख विशाल संकपाळ, शिवसेना तालुकाप्रमुख गणेश उतेकर यांच्यासह व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, लोकप्रिय उमेदवार संजय शेलार, संजय मोरे आणि अजित दादा संकपाळ यांच्या उपस्थितीमुळे सभेला मोठी उर्जा मिळाली. उपस्थित सर्व शिवसैनिकांचे मानाचा जय महाराष्ट्र करत वक्त्यांनी सभेची सुरुवात केली.
या वेळी तापोळा विभागाचे सुपुत्र व चेअरमन आनंद धनावडे यांच्यासह उपस्थित सर्वांचे प्रथम स्वागत करण्यात आले. भाषणात सांगण्यात आले की, या निवडणुकीत केवळ उमेदवार निवडून देणे एवढेच उद्दिष्ट नसून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तिन्ही खोऱ्यांतील तब्बल १०५ गावांमध्ये झालेला अभूतपूर्व विकास पुढे नेणे हे खरे ध्येय आहे. मागील अनेक वर्षांत जेवढा विकास अपेक्षित होता, तो विकास शिंदे साहेबांच्या माध्यमातून या विभागात झाल्याचे वक्त्यांनी ठामपणे सांगितले.
विभागाचा सुपुत्र राज्याचा मुख्यमंत्री होत असताना आपले कर्तव्य अधिक वाढते, असे नमूद करत या निवडणुकीत धनुष्यबाण चिन्हासमोरील बटण दाबून जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले. सकाळी दगडू दादा संकपाळ यांच्यासोबत झालेल्या बैठकीचा उल्लेख करत वक्त्यांनी सांगितले की, गावातील शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजपच्या सर्व गटांनी एकत्र येत आमदारांशी चर्चा केली असून, गावाच्या विकासासाठी एकजूट दाखवली आहे.
यावेळी अजित दादा संकपाळ यांना उमेदवारी दिल्याबद्दल त्यांचे आभार मानण्यात आले. एका छोट्या खेडेगावातील तरुणाला सरपंचपदाची संधी देत नेतृत्व घडवले आणि अवघ्या तीन वर्षांत गावासाठी साडेआठ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्यामुळे गाव आज विकासाच्या मार्गावर असल्याचे सांगण्यात आले. हा विकासाचा दृष्टिकोन संपूर्ण तालुक्यातील १०५ गावांपर्यंत पोहोचावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
विशेष म्हणजे, गावचे उपसरपंच जे राष्ट्रवादी काँग्रेसकडून आहेत, तेही सभेला उपस्थित होते आणि त्यांनी यावेळी शंभर टक्के शिवसेनेला मतदान करून गावच्या उमेदवारांना विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला. सर्व उपस्थितांचे आभार मानत अजित दादा संकपाळ हे प्रचंड मताधिक्याने विजयी होतील आणि सर्वजण एकजुटीने हा विजय साकार करू, असा विश्वास व्यक्त करत भाषणाची सांगता ‘जय हिंद’च्या घोषणेत करण्यात आली.
Comments
Post a Comment