महाबळेश्वर–पाचगणी रस्ता अतिक्रमणाच्या विळख्यात; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे बेकायदेशीर व्यवसाय बिनधास्त

महाबळेश्वर–पाचगणी रस्ता अतिक्रमणाच्या विळख्यात; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे बेकायदेशीर व्यवसाय बिनधास्त

✍️मिलिंद काळे,

महाबळेश्वर प्रतिनिधी –

महाबळेश्वर–पाचगणी हा अत्यंत महत्त्वाचा व वर्दळीचा रस्ता सध्या अतिक्रमणाच्या गंभीर समस्येने ग्रासला असून, रस्त्याच्या कडेला राजरोसपणे झाडांना खिळे ठोकून तवे, भांडी व इतर साहित्य विक्रीचा व्यवसाय सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे. हे व्यावसायिक नेमके कुठून आले, त्यांना येथे कोणी परवानगी दिली, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नसताना देखील हा बेकायदेशीर प्रकार खुलेआम सुरू आहे.

विशेष म्हणजे गेली सलग तीन वर्षे हेच व्यावसायिक याच ठिकाणी झोपड्या उभारून रस्त्यावर व्यवसाय करताना आढळून येत असून, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पोलीस प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून होत आहे. पर्यटन नगरी म्हणून ओळख असलेल्या महाबळेश्वरमध्ये अशा प्रकारे रस्त्यावर अतिक्रमण वाढत असताना प्रशासनाची भूमिका संशयास्पद ठरत आहे.

या अतिक्रमणामुळे वाहतुकीस अडथळे निर्माण होत असून, अपघातांचा धोका वाढला आहे. तसेच झाडांना खिळे ठोकून केलेला व्यवसाय पर्यावरणासाठीही घातक असून, निसर्गसंवर्धनाच्या नियमांना थेट हरताळ फासणारा आहे. तरीही संबंधित विभागांकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.


इतक्या दीर्घ काळापासून हा बेकायदेशीर व्यवसाय सुरू असताना या व्यावसायिकांना नेमका कोणाचा वरदहस्त आहे, हा प्रश्न आता चर्चेचा विषय बनला आहे. प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे अतिक्रमणधारकांचे मनोबल वाढले असून, भविष्यात रस्त्याची परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

महाबळेश्वर–पाचगणी रस्त्यावरील अतिक्रमण तातडीने हटवून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, तसेच या प्रकरणामागील नेमकी जबाबदारी निश्चित करावी, अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिक, पर्यावरणप्रेमी आणि वाहनचालकांकडून केली जात आहे.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl