डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया कामगार आघाडीच्या वतीने महाबळेश्वर तालुक्यात शौर्य दिन उत्साहात साजरा

डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया कामगार आघाडीच्या वतीने महाबळेश्वर तालुक्यात शौर्य दिन उत्साहात साजरा

महाबळेश्वर प्रतिनिधी –

महाबळेश्वर तालुक्यात डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया कामगार आघाडीच्या वतीने शौर्य दिवस भीमा कोरेगाव मोठ्या उत्साहात व अभिमानाने साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाची सुरुवात विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मानवंदना देऊन करण्यात आली. यावेळी उपस्थित कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी “शौर्य दिनाचा विजय असो”, “भीमा कोरेगावचा विजय असो” आणि “विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो” अशा जोशपूर्ण घोषणा देत परिसर दणाणून सोडला.

या शौर्य दिनाच्या कार्यक्रमास सातारा जिल्हा कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष ऋषीदादा अरुण वायदंडे, महिला शहर अध्यक्षा सायराताई शेख, शेअर सरचिटणीस नुरजाताई खरखंडे, संपर्कप्रमुख मोहनभाई कारंडे, अख्तर मापुळे, मोरे मामा तसेच सामाजिक कार्यकर्ते पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यांच्यासह कामगार आघाडीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी भीमा कोरेगावच्या शौर्याची ऐतिहासिक महत्त्व स्पष्ट करत, सामाजिक समता, न्याय आणि बंधुतेच्या मूल्यांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संघर्षाचा आदर्श पुढील पिढीने जपावा, असे आवाहन केले. शौर्य दिन हा केवळ विजयाचा उत्सव नसून अन्यायाविरोधातील लढ्याची प्रेरणा देणारा दिवस असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. कार्यक्रम शांततेत आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl