स्वाभिमानी नाभिक संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी अधिकराव चव्हाण; पाच वर्षांसाठी एकमताने निवड

स्वाभिमानी नाभिक संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी अधिकराव चव्हाण; पाच वर्षांसाठी एकमताने निवड

सातारा प्रतिनिधी — 

स्वाभिमानी नाभिक संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी अधिकराव चव्हाण यांची एकमताने निवड करण्यात आली असून ही घोषणा संघटनेचे संस्थापक व राज्याध्यक्ष शंकरराव गायकवाड यांनी केली. बोरगाव (ता. सातारा) येथील कुबेर छाया मल्टीपर्पज हॉलमध्ये नुकत्याच पार पडलेल्या संघटनेच्या महत्त्वपूर्ण बैठकीत राज्य कार्यकारिणी तसेच पश्चिम महाराष्ट्र कार्यकारिणीच्या पदाधिकारी निवडीचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

संघटनेचे संस्थापक व राज्याध्यक्ष शंकरराव गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी अधिकराव चव्हाण, राज्य उपाध्यक्षपदी प्रदीपराव काशीद, राज्य खजिनदारपदी शिवाजी खामकर, राज्य संपर्कप्रमुखपदी विजय काशीद, राज्य प्रसिद्धीप्रमुखपदी नारायण यादव यांची निवड करण्यात आली. तसेच पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षपदी नवनाथ काशीद, पश्चिम महाराष्ट्र खजिनदारपदी दत्तात्रय तावरे, पश्चिम महाराष्ट्र संघटकपदी सुनील जाधव आणि पश्चिम महाराष्ट्र प्रवक्तेपदी कृष्ण जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या सर्व पदाधिकाऱ्यांची निवड पुढील पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी करण्यात आली आहे.

अध्यक्षपदी निवड करताना अधिकराव चव्हाण यांनी यापूर्वी तालुका अध्यक्ष, जिल्हा अध्यक्ष अशा विविध पदांवर काम करताना संघटनात्मक बांधणीसाठी केलेल्या प्रामाणिक कार्याची, निष्ठेची आणि अनुभवाची दखल घेण्यात आल्याचे राज्याध्यक्ष शंकरराव गायकवाड यांनी सांगितले. पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष म्हणून संघटनेला सक्षम नेतृत्व देण्याची क्षमता त्यांच्यात असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

निवडीनंतर बोलताना अधिकराव चव्हाण म्हणाले की, स्वाभिमानी नाभिक संघटना ही सर्वसामान्य नाभिक समाजाच्या उन्नतीसाठी कार्य करणारी संघटना आहे. समाजातील सामान्य घटकांच्या न्याय्य हक्कांसाठी लोकशाही मार्गाने संघर्ष करत न्याय मिळवून देण्यासाठी संघटना कायम प्रयत्नशील राहील. पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष म्हणून काम करताना ग्रामीण भागाला केंद्रस्थानी ठेवून संघटनात्मक बांधणी करणे, समाजातील प्रश्न सोडवणे, तसेच नाभिक समाजातील सर्व घटकांच्या सामाजिक व आर्थिक उन्नतीसाठी कटिबद्ध राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

संघटनेतील विविध पदांवर काम करताना मिळालेला अनुभव समाजाच्या हितासाठी वापरणार असून संघटनेची ध्येय-धोरणे व विचारधारेशी प्रामाणिक राहून सर्व पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन समन्वयाने काम करण्याची ग्वाही त्यांनी दिली. स्वाभिमानी नाभिक संघटना ही पक्षविरहित असून समाजाच्या न्याय हक्कांसाठी, समाजप्रगतीसाठी आणि नाभिक समाजातील युवकांच्या कौशल्य विकासासाठी संघटनेच्या माध्यमातून प्रभावी कार्य केले जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.

या बैठकीत राज्य कार्यकारिणी, पश्चिम महाराष्ट्र कार्यकारिणी, जिल्हा व तालुका कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांचीही निवड करण्यात आली. यावेळी संघटनेचे संस्थापक राज्याध्यक्ष शंकरराव गायकवाड, राज्य सरचिटणीस मंगेशराव काशीद, राज्य महिला सदस्या अनिताताई काशीद, रामभाऊ पवार, सातारा तालुका अध्यक्ष जगन्नाथ पवार, पाटण तालुकाध्यक्ष बाबुराव पवार, कराड दक्षिण तालुकाध्यक्ष अर्जुन सूर्यवंशी, कराड उत्तर तालुका अध्यक्ष गणेश कदम, जिवाजी महाले समितीचे सदस्य संग्राम माने, विष्णू सपकाळ, दाजी सुर्वे यांच्यासह जिल्ह्यातील व तालुक्यातील सर्व पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने नाभिक समाजबांधव उपस्थित होते. बैठकीचे प्रास्ताविक राज्य सरचिटणीस मंगेश काशीद यांनी केले तर आभार रामभाऊ पवार यांनी मानले.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl