कोयना–सोळशी–कंदाटी विकासासाठी मुंबईत भव्य कार्यकर्ता मेळावा; संजुबाबा गायकवाड यांचा थेट संवाद

कोयना–सोळशी–कंदाटी विकासासाठी मुंबईत भव्य कार्यकर्ता मेळावा; संजुबाबा गायकवाड यांचा थेट संवाद

महाबळेश्वर प्रतिनिधी — 

सातारा जिल्हा परिषद आणि महाबळेश्वर पंचायत समितीच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोयना, सोळशी व कंदाटी परिसरातील विकासप्रेमी मुंबईकरांना एकत्र आणणारा भव्य कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला आहे. “आपला हक्काचा उमेदवार म्हणून आपली भेट मिळावी” या भावनेतून हा मेळावा शनिवार, दि. १० जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजता गोरेगाव पूर्व येथील कोयना भवन हॉलमध्ये पार पडणार आहे.

या मेळाव्यात तळदेव गटातून जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी आपले प्रतिनिधित्व करण्याच्या तयारीत असलेले महाबळेश्वर तालुक्याचे माजी सभापती संजुबाबा गायकवाड मुंबईकर मतदारांशी थेट संवाद साधणार आहेत. स्वर्गीय बाळासाहेब भिलारे दादा यांचे विचार आणि महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री नामदार मकरंद आबा पाटील यांच्या आशीर्वादाने संजुबाबा गायकवाड पुन्हा एकदा विकासाच्या मुद्द्यांवर निवडणुकीच्या रणांगणात उतरले आहेत.

सभापती पदाच्या कार्यकाळात महाबळेश्वर तालुक्याचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी त्यांनी केलेली कामगिरी आजही मतदारांच्या स्मरणात आहे. रस्ते, पाणीपुरवठा, पर्यटन विकास, मूलभूत सुविधा आणि दुर्गम भागातील प्रश्नांना त्यांनी प्राधान्य दिले. त्यामुळेच विकास कामांना गती देण्यासाठी आणि जनतेच्या सुख-दुःखात कायम सोबत राहण्यासाठी ते पुन्हा जनतेचा कौल मागत आहेत.

या बैठकीचा उद्देश केवळ निवडणुकीपुरता न राहता, कोयना–सोळशी–कंदाटी परिसरातील मुंबईत राहणाऱ्या मतदारांशी संवाद साधणे, त्यांच्या अपेक्षा जाणून घेणे आणि आगामी काळातील विकासाचा आराखडा मांडणे हा आहे. त्यामुळे या मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

या कार्यक्रमासाठी शैलेश शिंदे (दाभे), गोविंद जाधव (चतुरबेट), सोमराज शिंदे (चतुरबेट), शांताराम कदम (सोनाट), तानाजी सकपाळ (घावरी) आणि संतोष जाधव (सौंदरी) हे संपर्कप्रमुख म्हणून काम पाहत असून, उपस्थितांसाठी भोजनाची व्यवस्थाही करण्यात आली आहे.

कोयना, सोळशी आणि कंदाटी परिसराच्या विकासासाठी एकत्र येण्याची ही संधी असून, सर्व विकासप्रेमी मुंबईकरांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl