केंद्राच्या विशेष सहाय्य योजनेंतर्गत महाबळेश्वर नगरपरिषदेला ६४ कोटी ६५ लाखांची विकास कामे मंजूर

केंद्राच्या विशेष सहाय्य योजनेंतर्गत महाबळेश्वर नगरपरिषदेला ६४ कोटी ६५ लाखांची विकास कामे मंजूर

महाबळेश्वर प्रतिनिधी –

केंद्र शासनाच्या “भांडवली गुंतवणुकीसाठी राज्यांना विशेष सहाय्य २०२५-२६” या महत्त्वाकांक्षी योजनेंतर्गत महाबळेश्वर गिरिस्थान नगरपरिषदेला मोठा विकासनिधी मंजूर झाला असून, राज्य शासनाच्या नगरविकास विभागाकडून एकूण ६४ कोटी ६५ लाख २४ हजार ६१६ रुपयांच्या विविध विकास कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या निधीमुळे महाबळेश्वर शहरातील पायाभूत सुविधा अधिक सक्षम होणार असून, नागरिकांसह पर्यटकांनाही याचा मोठा लाभ होणार आहे.

या योजनेअंतर्गत महाबळेश्वर गिरिस्थान नगरपरिषदेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीच्या बांधकामाला मंजुरी देण्यात आली आहे. सध्या विविध ठिकाणी विभागीय कार्यालये कार्यरत असून, नवीन प्रशासकीय इमारतीमुळे सर्व प्रशासकीय कामकाज एका छताखाली येणार आहे. त्यामुळे नागरिकांना सेवा अधिक वेगाने व सुलभरीत्या मिळण्यास मदत होणार आहे.

तसेच महाबळेश्वर गिरिस्थान नगरपरिषद हद्दीतील तापोळा रोडपासून ससून रोड, जन्नीमाता सोसायटी मार्गे जुना सातारा रोडपर्यंत रस्त्याचे काँक्रीटीकरण व रस्त्यालगत पावसाळी गटारांचे बांधकाम करण्यात येणार आहे. या रस्त्यावरून दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असून, पावसाळ्यात होणाऱ्या चिखल व पाणी साचण्याच्या समस्येवर या कामामुळे कायमस्वरूपी तोडगा निघणार आहे.

महाबळेश्वर नगरपरिषद हद्दीतील माखरीया हायस्कूल ते तापोळा रोड नगरपरिषद हद्दीपर्यंत रस्त्याचे काँक्रीटीकरण तसेच पूल बांधकामालाही प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या भागातील नागरिकांसाठी हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा असून, पूल व मजबूत रस्ता झाल्याने वाहतूक अधिक सुरक्षित आणि सुलभ होणार आहे.

याशिवाय महाबळेश्वर रोडवरील आर. आर. हेरिटेज रिसॉर्ट कॉर्नर ते ग्लेनगिरी बंगलो आणि पुढे लॉडविक पॉईंट रोडपर्यंत रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे. हा परिसर पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असल्याने, या कामामुळे पर्यटकांच्या सोयीसुविधांमध्ये मोठी भर पडणार असून, पर्यटनस्थळाच्या सौंदर्यातही वाढ होणार आहे.

एकूणच केंद्र शासनाच्या विशेष सहाय्य योजनेंतर्गत मंजूर झालेल्या या ६४ कोटी ६५ लाख रुपयांच्या विकास कामांमुळे महाबळेश्वर शहरातील प्रशासकीय सुविधा, रस्ते, पूल व पावसाळी गटार व्यवस्था अधिक मजबूत होणार आहे. या विकासकामांमुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन सुकर होण्यासोबतच पर्यटन शहर म्हणून महाबळेश्वरचा दर्जा अधिक उंचावेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl