महाबळेश्वर गिरीस्थान नगरपरिषद उपाध्यक्ष निवडणूक व विषय समित्यांचा कार्यक्रम जाहीर

महाबळेश्वर गिरीस्थान नगरपरिषद उपाध्यक्ष निवडणूक व विषय समित्यांचा कार्यक्रम जाहीर

महाबळेश्वर | प्रतिनिधी –

महाबळेश्वर गिरीस्थान नगरपरिषद, जिल्हा सातारा यांच्या उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीसह नामनिर्देशित सदस्यांची नियुक्ती आणि विषय समित्यांच्या रचनेसंदर्भातील अधिकृत कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. हा सर्व कार्यक्रम गुरुवार, दिनांक २२ जानेवारी २०२६ रोजी नगरपरिषद कार्यालयात पार पडणार आहे.

जाहीर कार्यक्रमानुसार नगरपरिषदेच्या उपाध्यक्ष पदासाठी इच्छुक उमेदवारांनी मुख्याधिकारी, महाबळेश्वर नगरपरिषद यांच्याकडे आपली नामनिर्देशन पत्रे सकाळी ११.०० ते दुपारी १.०० वाजेपर्यंत सादर करावीत. त्यानंतर पिठासिन अधिकारी तथा नगराध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी १.०० ते १.१५ या वेळेत नामनिर्देशन पत्रांची छाननी करण्यात येणार आहे. छाननीनंतर उमेदवारांना उमेदवारी मागे घेण्यासाठी १५ मिनिटांचा अवधी देण्यात येणार असून दुपारी १.३० वाजेपर्यंत माघार घेता येणार आहे. अर्ज माघारीनंतर आवश्यकतेनुसार उपाध्यक्ष पदाची निवडणूक तत्काळ घेण्यात येणार आहे.

यानंतर महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती (नामनिर्देशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या करण्याची पद्धत) नियम, २०१० व सुधारणा नियम २०१२ नुसार नामनिर्देशित सदस्यांची नियुक्ती करण्यात येणार असून ही प्रक्रिया दुपारी २.१५ वाजता पार पडणार आहे.

त्यानंतर दुपारी २.४५ वाजता महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नागरी अधिनियम १९६५ चे कलम ६५ (३) व (५) नुसार नगरपरिषदेत स्थापन होणाऱ्या विविध विषय समित्या, त्या समित्यांमधील सदस्य संख्या निश्चित करणे तसेच उपाध्यक्ष ज्या समितीचे पदसिद्ध सभापती असतील ती समिती निश्चित करण्याबाबतची कार्यवाही केली जाणार आहे.

या कार्यक्रमामुळे महाबळेश्वर नगरपरिषदेत राजकीय हालचालींना वेग आला असून उपाध्यक्ष पदासाठी कोण उमेदवारी अर्ज दाखल करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नगरपरिषदेच्या आगामी कार्यकाळातील सत्तासमीकरण आणि विकासाच्या दृष्टीने हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl